Ceremony to mark birth of buffalo calf | Unique Celebration VideoQR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सोशल मीडियावर आपल्याला अनेक विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी मजेशीर व्हिडिओ असतात तर कधी थरारक अपघातांचे व्हिडिओ असतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा हटके आहे, ज्यात एका शेतकरी बांधवाने चक्क म्हशीच्या रेडकुचे बारसं धुमधडाक्यात साजरे केलेले आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावातील अनेक नागरिक एका घराबाहेर बसलेले दिसत आहे.जिथे जर तुम्ही पाहिले तर नामकरणाचा सोहळा सुरु असलेला दिसत आहे.त्यासाठी त्या ठिकाणी एक लहानसा पाळणा देखील बांधण्यात आलेला आहे.जर पाळण्यात पाहिले तर तुम्हाला एक म्हशीचे रेडकू दिसत आहे आणि तिथे जमलेले गावकरी म्हशीच्या रेडकूचा नामकरण सोहळा साजरा करताना दिसत आहे.अनोखे बारसे - महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील राघूची वाडी येथे बाजीराव करवर यांनी केलं म्हशीच्या रेडक्याचे बारसंव्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या nad_mardani या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे मात्र नक्की कोणत्या गावातील आहे हे समजू शकलेले नाही,परंतू व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक एका नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर ही करण्यात आलेला आहे. नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral) होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे, ''खूपच सुंदर माऊली''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''हे फक्त शेतकरीच करू शकतो'' तर काहींनी विषय हार्ड म्हणून प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.![]()
Browser Setting
Ceremony to mark birth of buffalo calf
WATCH : A grandeur naming ceremony of a calfViral Video : रेडकाचं बारसं...!
बारशाचा कार्यक्रम आहे... तो चक्क म्हशीच्या रेडकाचं
Support belgavkar