कर्नाटक—belgavkar : मौजमजेसाठी मैत्रीणींसमोर तुंगभद्रा नदीत उडी मारणाऱ्या हैदराबाद येथील महिला डॉ. अनन्या राव यांचा मृतदेह सापडला आहे. ही घटना हंपीमध्ये घडली. रील काढण्यासाठी तिने तुंगभद्रेत उडी मारली. डॉ. अनन्या राव आणि तिच्या इतर दोन मैत्रीणी सतविन आणि हशिता या हंपी येथे सहलीसाठी आल्या होत्या.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
स्मारकांना भेट दिल्यानंतर त्या मंगळवारी रात्री सानापुर गावातील अतिथीगृहात राहिल्या. बुधवारी दुपारी तिघीही पोहण्यासाठी तुंगभद्रा नदीत गेल्या. यावेळी अनन्या रावने 25 फूट उंच कड्यावरून पाण्यात उडी मारली. अनन्याने खडकावरून पाण्यात उडी मारली आणि काही वेळ पाण्यात पोहली.Please click here to Watch this Video or Photo on X (twitter)
तथापि, नदीतील जोराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून जाऊ लागली. यावेळी तिच्या मैत्रीणींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. गुरुवारी सकाळी अनन्या राव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
