चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत शनिवारी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्याआधी परंपरेनुसार दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. पण त्यावेळी एक गोंधळ झाल्याचे दिसले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघांचे खेळाडू, सामनाधिकारी, स्पर्धेचे शुभंकर मैदानात आले. तसेच दोन्ही संघांचा राष्ट्रध्वजही मैदानात आणण्यात आला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
यानंतर पहिल्यांना इंग्लंडचे राष्ट्रगीत झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजणार होते. परंतु, चुकून काही सेंकदासाठी भारताचे राष्ट्रगीत 'जण गण मन', सुरु झाले होते. परंतु, व्यवस्थापनाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित ते बंद करून ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजवले. दरम्यान, ही चूक सामना पाहाणाऱ्यांनी मात्र झटक्यात पकडली.
तथापि, हा सामना दोन्ही संघांचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिलाच सामना आहे. या सामन्यातून दोन्ही संघ स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करणार आहे. दरम्यान, या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यांचे बरेच प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, ज्यात नियमित कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोस हेजलवूड हे गोलंदाजही आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बरेच नवे चेहरेही दिसत आहेत. तसेच स्मिथसह ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स कॅरे, ग्लेन मॅक्सवेल, ऍडम झाम्पा हे अनुभवी खेळाडूही आहेत. इंग्लंडने या सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून जॅमी स्मिथला संधी दिली आहे. त्याशिवाय जोफ्रा आर्चरचेही पुनरागमन झाले आहे. त्यांच्या संघातही फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रुक, जो रुट, कर्णधार जॉस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन हे अनुभवी फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत आर्चरशिवाय आदिल रशिद, मार्क वूड यांचा समावेश आहे.
असे आहेत प्लेइंग इलेव्हनऑस्ट्रेलिया - मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ऍलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन
इंग्लंड - फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशिद, मार्क वूड
