
बेळगावातील घटनेनंतर कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी वाहतूक थांबवलेली आहे. सोलापुरातील सात रस्ता परिसरात कर्नाटकला जाणाऱ्या बसला अडून बसला काळे फासून बसच्या काचेवर 'जय महाराष्ट्र' लिहून व्यक्त करण्यात आला निषेध.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
कर्नाटकातील चित्रदूर्गमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला अडवून वाहक आणि चालकाला काळे फासण्याचा झाला होता प्रकार.
त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदारपणे व्यक्त करण्यात आला निषेध.
कानडी बस चालकाचा हार आणि भगवा रंग लावून बेळगावसह कर्नाटक प्रकरणाचा व्यक्त करण्यात आला निषेध.
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कानडी चालकाने जय महाराष्ट्र म्हटल्यानंतरच बस झाली विजापूरच्या दिशेने रवाना.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत... केवळ कोल्हापुरातूनच नाही तर सर्वच आगारातून कर्नाटकात एसटी बसची सेवा थांबवली आहे...
त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होत असल्याचे समोर येत आहे.
कोल्हापूर, सांगली सोलापूर या सीमेलगतच्या जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येने प्रवासी दोन राज्यात ये जा करत असतात.
या घटनेचे पडसाद पुण्यासह कोल्हापुरात देखील उमटल्याचं बघायला मिळालं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटकातील बसेलला आंदोलकांनी काळं फासत निषेध नोंदवला होता. कर्नाटकात चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटकातील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं होतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.
महाराष्ट्रातून दिवसाला साधारण अडीचशे बस कर्नाटकात जातात. तर, कर्नाटकातूनदेखील तेवढ्याच बस महाराष्ट्रात येतात. पुण्यातून कर्नाटकातील बेळगाव, कलबुर्गी, विजापूर या शहरांसाठी आठ ते नऊ बस धावतात. तसेच, सहा ते सात बस कर्नाटकातून पुण्यात येतात. या सर्व बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर बस थांबविल्या आहेत. त्यामुळे पुण्यातून कर्नाटकात जाण्यासाठी कोल्हापूर सीमेपर्यंत जावे लागते. तेथून पुन्हा कर्नाटकाच्या बसने प्रवास करावा लागत आहे
