बेळगाव : गुंडा अ‍ॅक्ट; कुख्यात गुंडाला अटक

बेळगाव : गुंडा अ‍ॅक्ट;
कुख्यात गुंडाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

कुख्यात गुंड आणि राऊडी शिटर विशाल सिंह चौहान

बेळगाव—belgavkar : कुख्यात गुंड विशालसिंग चव्हाण याला गुंडा कायद्याखाली पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुंडा ॲक्ट खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला गुलबर्गा येथील कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. बेळगाव पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 28, मूळ रा. चिक्कनंदीहळ्ळी, ता. कित्तूर, सध्या रा. कदम बिल्डिंग शास्त्रीनगर, बेळगाव शहर) असे त्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारीही असलेले रोहन जगदीश यांनी यासंबंधीचा आदेश बजावला आहे.
विशेष दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशालसिंगला गुलबर्गा येथे हलविले आहे. तो गुन्हेगारी कारवायांनी सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर तो पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरला होता. खून, खुनी हल्ला, अपहरण आदी 13 हून अधिक गुन्हे त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकात नोंद आहेत. काही प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर कोर्टात सुनावणीला हजर रहायचा. उपलब्ध माहितीनुसार खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारी रोहन जगदीश यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर विशालसिंगवर गुंडा कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात शास्त्रीनगर परिसरातील एका तरुणाला विशालसिंगने धमकावल्याची घटना घडली होती. त्याला पोलिसांनी गुंडा कायद्याखाली अटक केली आहे. रियल इस्टेट व्यावसायिक व बिल्डर राजू दोड्डबोम्मण्णावर खून प्रकरणानंतर विशालसिंग फरारी झाला होता. दि. 21 जून 2022 रोजी वीरभद्रनगर परिसरात तत्कालिन एसीपी नारायण बरमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. अखेर त्याच्यावर गुंडा कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.
त्यानंतर तडीपार आदेशाचे उल्लंघन करून विशाल सिंग पुन्हा बेळगाव शहरात आला आणि टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये पैशासाठी एकाचे अपहरण केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले होते.

Belgaum Vishal Singh Arrested Gunda Act belgavkar बेळगाव Gunda Act belgaum

Belgaum Vishal Singh Arrested Gunda Act

Vishal Singh Arrested Gunda Act belgavkar

Vishal Singh Arrested belgaum

बेळगाव : गुंडा अ‍ॅक्ट; कुख्यात गुंडाला अटक
कुख्यात गुंड आणि राऊडी शिटर विशाल सिंह चौहान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm