Video : 'भारत माता की जय' म्हणताच जमावाकडून हल्ला? @कर्नाटक

Video : 'भारत माता की जय' म्हणताच जमावाकडून हल्ला?
@कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजपकडून व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप BJP

BJP supporters celebrating PM Modi’s oath ceremony stabbed in Mangaluru

कर्नाटक @मंगळुरु : एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत माता की जय म्हणल्यानंतर दोन तरुणांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटकच्या मंगळुरुमधील हा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भाजपने सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारला यावरून धारेवर धरलं आहे. कर्नाटकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचे राज्य आता राहिलेले नाही, असं भाजपकडून म्हणण्यात आलं आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी 'भारत माता की जय'ची घोषणा दिल्यानंतर जमाव त्यांचा पाठलाग करतो. 'belgavkar.com' या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
भाजपने दावा केलाय की, ते पक्षाचे कार्यकर्ते असून हरिष अंचन आणि नंदकुमार अशी त्यांची नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ते साजरा करत होते. मोठ्या प्रमाणात लोक असलेल्या ठिकाणी त्यांनी 'भारत माता की जय'ची घोषणा दिली. त्यानंतर जमावाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दोन तरुणांनी जमावाच्या जवळ जाताचं भारत माता की जय म्हटलं आणि त्याठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरुण भगवे दुपट्टे घातले असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणांच्या घोषणेने जमाव संतापला, त्यानंतर त्यांचा पाठलाग केला जातो. जमाव त्यांचा पाठलाग करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. व्हिडिओ इथेच संपतो. भाजपने दावा केलाय की, 'त्यानंतर तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जमाव एका विशिष्ट धर्माचा होता.'
भाजपने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, 'असं दिसतंय की कर्नाटकमध्ये तुघलकी राज्य आलं आहे. भारत माता की जय म्हणणे आता सुरक्षित राहिलेलं नाही. सिद्धरामय्या यांच्या काळात भारताबाबत द्वेष निर्माण केला जात आहे. मोदींचा शपथविधी साजरा करणाऱ्या दोन भाजप कार्यकर्त्यांवर भारत माता की जय म्हटल्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यांच्यावर अबुबकर, बशिर, सिद्दिक, मोनू आणि इतर 20 जणांनी हल्ला केलाय.'

BJP supporters celebrating PM Modi’s oath ceremony stabbed in Mangaluru

20 hours

3 held over attack on BJP workers in Boliyar

BJP supporters going home after celebrating Modi swearing in stabbed in Mangaluru

22 hours ago

Video : 'भारत माता की जय' म्हणताच जमावाकडून हल्ला? @कर्नाटक
भाजपकडून व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप BJP

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm