बेळगाव—belgavkar—belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या घरासमोर सोमवारी सकाळपासून पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पोलिस तैनात आहेत? याची माहिती शेळके यांना दिलेली नाही. बाळेकुंद्री खूर्द येथे कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस वाहकाला मारहाण झाल्यापासून पुन्हा कन्नड संघटना ठिकठिकाणी आंदोलन करून वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत शेळके यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केली होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
यात आक्षेपार्ह वक्तव्य नसतानाही कन्नड संघटनाच्या दबावाखाली माळमारुती पोलिसांनी शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेळके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करून मराठी व कन्नड वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मात्र, चूक नसताना गुन्हा दाखल केल्याने समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही शेळके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
शेळके यांच्या घरातील सदस्यांनी पोलिस कशासाठी थांबविले आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस माहिती देत नाहीत. बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि कन्नड भाषिकांमधील वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांच्यावर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपाखाली माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. POCSO गुन्हा दाखल झालेल्या बस कंडक्टर आणि बस कंडक्टरचे समथर्न करणार्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्याविरुद्ध अपशब्द (नीच / नालायक) वापरल्याविरुद्ध शुभम शेळकेवर रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तणावाची स्थिती आहे. बस प्रवासादरम्यान युवती आणि वाहक यांच्यात वाद झाल्याने मारिहाळ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील एका प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून दुसऱ्या एका प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांची चौकशी सुरु असतानाच शुभम शेळके यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट (Video) केली, असा आरोप करण्यात आला आहे.
शुभम शेळके यांच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळीही त्यांनी सोशल मीडियावर भाषिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.
मराठी भाषिक संघटनांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत मराठी भाषिकांची गळचेपीचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले असून सोशल मीडियावरही पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.
