टीम इंडियाच्या विजयानं पाकिस्तान इतका का खूश झाला?

टीम इंडियाच्या विजयानं पाकिस्तान इतका का खूश झाला?

belgavkar.com | belgaum | belgavkar

T20 World Cup 2024 Qualification Scenarios : How can Pakistan qualify

Pakistan can still qualify for Super 8

USA vs IND T20 World Cup 2024 : भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात युएसएचा 7 विकेट्स आणि 8 बॉल चेंडू राखून पराभव केला. भारताने या विजयाबरोबरच सुपर 8 मधील आपले तिकीट निश्चित केलं. भारताच्या या विजयाने पाकिस्तानला मात्र मोठा दिलासा मिळाला. भारताने युएसएला 110 धावात रोखलं होतं. त्यानंतर हे आव्हान भारताने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानचा जीव भांड्यात पडला : टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ खराब कामगिरी करतोय. त्यांना युएसए आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या दोन पराभवांमुळे त्यांचे सुपर 8 मधील प्रवेश लटकला आहे. भारत-युएसए सामन्यात काय होतं यावरही त्यांच गणित अवलंबून होतं. युएसएला फक्त एक सामना जिंकायचा होता. मात्र भारताने युएसएला चांगल्या पद्धतीने मात दिल्याने पाकिस्तानचे आव्हान एक दिवस का असेना अबाधित राहिलंं आहे. मात्र असं असलं तरी युएसएने आयर्लंडला मात दिली तर पाकिस्तानचं सुपर 8 गाठण्याचं स्वप्न भंगणार आहे.
पाकिस्तानला किती संधी? : ग्रुप A मध्ये भारतीय संघाने 6 गुणांसह सुपर 8 चं तिकीट नक्की केलं आहे. भारताने 3 पैकी 3 सामने जिंकले असून त्यांचा रननेट रनरेट +1.137 आहे. युएसए 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.127 आहे. मात्र भारताने युएसएचा पराभव केला अन् पाकिस्तानने कॅनडाचा पराभव केल्यानंतर चित्र थोडं बदललं आहे. पाकिस्तानचं नेट रनरेट हे +0.191 इतकं झालं आहे. हे युएसएपेक्षा चांगलं नेट रनरेट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा वाढल्या आहेत. मात्र तर युएसएने आयर्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार आहे.

Can Pakistan qualify for Super 8s? Scenarios explained after Indias win over USA

15 hours ago

India Today

T20 World Cup 2024 Qualification Scenarios : How can Pakistan qualify

1 day ago

The Economic Times

Pakistan can still qualify for Super 8

टीम इंडियाच्या विजयानं पाकिस्तान इतका का खूश झाला?
T20 World Cup 2024 Qualification Scenarios : How can Pakistan qualify

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm