बेळगाव—belgavkar—belgaum : दोन मोटारसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन इनाम कोळींद्रे (ता. चंदगड) येथील एक तरुण जागीच ठार झाला. तर बेळगावचा तरुण जखमी झाला आहे. रविवारी रात्री कुद्रेमनीजवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. निलेश ज्ञानेश्वर दुरी (वय 25, रा. इनाम कोळींद्रे, ता. चंदगड) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
आणखी एका मोटारसायकलवरील अकिब जाविद मुश्ताक मकानदार (वय 26, रा. न्यू गांधीनगर) हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
निलेश बेळगावहून चंदगडकडे जात होता. तर जखमी अकिब हा बेळगावकडे येत होता. कुद्रेमनी फाट्याजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन निलेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला
