Attack on bus conductor : 4 held, girl files POCSO complaint in Karnatakaबेळगाव—belgavkar—belgaum : बस तिकीटावरुन झालेल्या वादावादीत बाळेकुंद्री खूर्द येथे केएसआरटीसी बस कंडक्टरला मारहाण करणाऱ्या 4 जणांना मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. परंतु अल्पवयीन मुलीशी बस तिकीटावरुन झालेल्या भांडणात कंडक्टरने अपशब्द वापरल्याचा आरोप करत बस कंडक्टर महादेव हुक्केरी (वय 55) विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कन्नड मराठी भाषिक वादाचा आरोप करणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसवाहकावर मारीहाळ पोलिस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
त्यामुळे हे प्रकरण बसवाहकाच्या चांगलेच अंगलट आले होते. महादेव हुक्केरी (वय 55) असे बसवाहकाचे नाव आहे. मराठी भाषिक मुलीला 'कर्नाटकात राहतेस, तर कन्नडमध्ये बोल', असा दम भरत तिला शिवीगाळ करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागातील बसवाहक महादेव हुक्केरी याला नागरिकांनी जाब विचारला होता; पण बसवाहकाने आपली चूक झाकण्यासाठी त्याला भाषिक वादाची जोड देत मुलीनेच आपल्याला 'मराठीमध्ये बोल' असे म्हणत दम दिल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आल्यामुळे आता या प्रकरणात कंडक्टरविरुद्ध दाखल केलेल्या Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) खटल्याला एक वेगळे वळण मिळाले आहे, अल्पवयीन मुलीच्या पालकांनी व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले आहे. हे तिकिटावरून भांडण आहे. ते कन्नड आणि मराठी म्हणून त्याचा प्रचार करत आहेत. आम्ही कन्नड भाषेचे चाहते आहोत, आमच्यात कोणताही जातीय भेद नाही. ते विनाकारण कन्नड आणि मराठीबद्दल खोटा प्रचार करत आहेत. यावर कर्नाटक आणि महाराष्ट्रात संघर्ष सुरु झाला आहे. आम्ही खटला मागे घेऊ, हे इथेच थांबवा. आम्ही स्वेच्छेने खटला मागे घेत आहोत. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सांगितले की आमच्यावर कोणताही दबाव नाही.
