1984 मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या त्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार यांना 1 नोव्हेंबर 1984 या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायलायने दोषी ठरवलं होतं. 12 फेब्रुवारीला हा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आज त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सज्जन कुमार यांना फाशी देण्याची मागणीया प्रकरणात सीबीआय आणि तक्रारदारांनी सज्जन कुमार यांना फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र रोज अव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांना 12 फेब्रुवारीला दोषी ठरवलं होतं आणि आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमध्ये झालेल्या ऑपरेशन ‘ब्लू स्टार’नंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर 1 नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत शिखांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं. सज्जन कुमार हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते तीनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेलेले आहेत. सज्जन कुमार यांनी 1977 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिलांदा दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत कमी कालावधीतच त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचा विश्वास संपादित केला होता.
शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर सज्जन कुमार यांनी शीखांविरोधात दंगल भडकवण्याचे काम केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. शीख दंगलीनंतर 1999 आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही सज्जन कुमार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.सज्जन कुमार यांच्यावर कोणकोणते आरोप?1 नोव्हेंबर 1984 रोजी उसळलेल्या दिल्ली दंगलीत सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग या दोन शीख व्यक्तींची हत्या झाली. याप्रकरणी पीडितांच्या पत्नी आणि आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल. 1984 मध्ये ज्या जमावाने जसवंत आणि तरुणदीप सिंग यांची हत्या केली, त्याचे नेतृत्व सज्जन कुमार करत होते, असा आरोप करण्यात आला. 9 सप्टेंबर 1985 रोजी तक्रारदारांनी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला जबाब नोंदवला. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिल्लीतील संघटित हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती केली होती.
दिल्ली कॅन्टमधील पालम कॉलनीमध्ये 5 शिखांच्या हत्येनंतर गुरुद्वारा जाळण्यात आला. या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळले. 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सप्टेंबर 2023 रोजी, दिल्लीतील सुलतानपुरी येथे झालेल्या 3 शिखांच्या हत्येप्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. दंगलीत सीबीआयच्या प्रमुख साक्षीदार चाम कौर यांनी सज्जन जमावाला भडकावत असल्याचा आरोप केला होता. 1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहारमध्ये सरदार जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली. दंगलखोरांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. यानंतर दोन्ही शिखांना जिवंत जाळण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दोषी ठरवण्यात आले. 25 फेब्रुवारी रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
