Shocking Video : गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही काळापूर्वी (50-60+) एका वयानंतर हृदयविकाराच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता शाळकरी मुलांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आताच्या अनेक तरुणांना हृदयविकाराने ग्रासल्याचे समोर येत आहे. कधी लग्नाच्या वरातीमध्ये तर कधी जीममध्ये तर कधी शाळेतचं हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत्यू झाल्याची अनेक उदाहरण पाहायला मिळत आहेत. असाच काहीसा प्रकार चंदीगडमध्ये पाहायला मिळाल जिथे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने जीव गेला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
चंदीगड विद्यापीठात सुरु असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू चॅम्पियनशिपदरम्यान हा सगळा प्रकार घडला (All India Inter-University Wushu Championship at Chandigarh University). सोमवारी जयपूर येथे राहणारा मोहित शर्मा याचा स्पर्धेदरम्यान मृत्यू झाला. रिंगमध्ये लढत असताना मोहितला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला आणि मग उठलाच नाही. या स्पर्धेत नाव कमावलेल्या मोहितच्या आकस्मिक मृत्यूने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. मोहितला रिंगमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला रुग्णालयात नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये मोहित रिंगमध्ये तोंडावर पडताना दिसत आहे. मोहितने कोणतीही हालचाल न केल्याने रेफ्रींनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही. रेफ्रींनी तात्काळ इतर लोकांना बोलावून मोहितला उचलून रिंगच्या बाहेर नेलं. त्यानंतर त्याला मोहालीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या तपासणीत मोहितचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. मोहित तीन दिवसांपूर्वी जयपूर येथून चॅम्पियनशिप खेळण्यासाठी आला होता. मात्र त्याला मृत्यूने गाठलं.
मोहित 85 किलो वजनी गटात खेळत होता. त्याने पहिली फेरी जिंकली होती. दुसऱ्या फेरीतही तो आघाडीवर होता. त्यानंतर रिंगमध्ये प्रवेश करताच त्याची प्रकृती खालावली आणि तो तोंडावर पडला. सामना सुरु असताना प्रतिस्पर्ध्याशी मोहितला रिंगमधून बाहेर काढले आणि दोघेही खाली पडले. यानंतर, दोघेही खेळाडू उभे राहिले आणि रिंगमध्ये परत आले. रेफ्रीने दोघांना पुन्हा लढण्यासाठी समोरासमोर येण्यास सांगितले. मग अचानक मोहित त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे आला आणि तोंडावर पडला. यानंतर रेफरीने इतर खेळाडूंना वर बोलवलं, प्रत्येकजण मोहितला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता पण तो काहीच हालचाल करत नव्हता. यानंतर त्याला उचलून रुग्णालयात नेले.
