hazardous artificial colors are being used in fried green peasबेळगाव—belgavkar—belgaum : गोबी मंच्युरी, बॉम्बे मिठाई (कॉटन कॅण्डी), कबाब, पाणी पुरीनंतर आता बाजारात मिळणाऱ्या रंगमिश्रिम तळलेल्या वाटाण्यांवर बंदीचा विचार केला जात आहे. जिल्ह्यातील एकूण 6 ठिकाणचे नमुने संग्रहित करुन ते चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन नमुन्यांबाबतचा अहवाल सादर झाला आहे. त्यामध्ये दोन नमुने आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
crispy and crunchy green peas being adulterated with artificial food colourKarnataka Food Safety and Standards Authority of India (FSSAI)खाद्यपदार्थामध्ये कृत्रिम रंगांचा वापर वाढला आहे. याबाबत अनेकदा जागृती करण्यात आली तरी संबंधितांनी त्याचा वापर सुरुच ठेवला होता. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन त्याविरुद्ध कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. कृत्रिम रंगांमध्ये धोकादायक रसायनांचा वापर केला जातो. मानवी शरीरावर याचे विपरित परिणाम होतात, अशा रसायनांमुळे कॅन्सरचा धोका संभवतो. त्यामुळे वेळोवेळी जागृती केली जात आहे.
Artificial food colours are known to be dangerous for the human body'Yuck! That Green Chemical' : Netizens React To Viral Video Showing Man Adding Colour To Peasगतवर्षी मार्चमध्ये राज्य सरकारने गोबी मंच्युरी, कॉटन कॅण्डीमध्ये कृत्रिम रंगांच्या वापरावर बंदीचा आदेश जारी केला होता. याची तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. आता तळलेल्या रंगीबेरंगी वाटाण्यांमध्ये कृत्रिम रंगांच्या वापरावाबत चाचण्या केल्या जात आहेत. याचे नमुने संग्रहित करुन प्रयोगशाळेत चाचण्या सुरु आहेत. धोकादायक असणाऱ्या वाटाण्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हिरव्या, लाल रंगांचे वाटाणे तयार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. धोकादायक रंग त्यामध्ये वापरण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. याची दखल घेताना अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी याचे नमुने संग्रहित करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये बेळगाव शहर, ग्रामीण, बैलहोंगल, चिकोडी, हुक्केरी, गोकाक अशा सहा ठिकाणी रंगीबेरंगी वाटाण्यांचे नमुने संग्रहित करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन नमुन्यांचाअहवाल हाती आला आहे. त्यापैकी दोन नमुने आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. कृत्रिम रंगातील टॅट्राझीनचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो, याच्या वारंवार सेवनाने कॅन्सरचा धोका निर्माण होतो. अँलर्जी आणि इतर काही दुष्परिणाम आहेत.
अनेक देशांमध्ये अशा कृत्रिम रंगांच्या वापरावर काही वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. गोबी मंच्युरी, पाणी पुरीनंतर आता तळलेल्या वाटाण्यांमध्ये रंगांच्या वापराबाबत गांभीर्याने कारवाई सुरु आहे. शहरात एका ठिकाणी नमुना संग्रहित केला असून तो धोकादायक असल्यास कारवाई केली जाईल. लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर यापुढे नियंत्रण असणार आहे.
वाय. बी. इळिगेर - शहर अन्नसुरक्षा अधिकारी, बेळगाव
वाटाण्यामध्ये कृत्रिम रंगांबाबत सहा ठिकाणचे नमुने संग्रहित केले आहेत. त्यावर चाचणी केली जात आहे. तीन अहवाल हाती असून त्यापैकी दोन नमुने धोकादायक असल्याचा निष्कर्ष आहे. आरोग्यासाठी धोकादायक असणारे अन्नपदार्थ विकणे गुन्हा असून संबंधितांविरुद्ध खटला दाखल केला जाईल.
- डॉ. चेतन कंकणवाडी, जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारी, एफएसएसएआय
