शिवशाही बसमध्ये गावाला जाणार्‍या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात घटना @पुणे

शिवशाही बसमध्ये गावाला जाणार्‍या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात घटना पुणे

महाराष्ट्र पुणे-स्वारगेट स्थानकातील CCTV आलं समोर. आरोपीचा चेहराही उघड झाला...

Pune woman raped inside stationary bus at Swargate bus stand | Serial offender rapes woman in MSRTC bus in Pune

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

pune-woman-raped-inside-stationary-bus-at-swargate-bus-stand-202502.jpg | शिवशाही बसमध्ये गावाला जाणार्‍या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात घटना @पुणे | belgaum news | belgavkar बेळगावकर
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील स्वारगेट स्थानकात ही घटना घडली असून सीसीटीव्ही समोर आलं आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान आरोपीची ओळख पटली असून, त्याचा फोटो समोर आला आहे.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
धक्कादायक म्हणजे घटनेतील आरोपी जामिनीवर सुटलेला आहे, पोलिसांनीही पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं आहे याची माहिती दिली  आहे. 
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं आहे?
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितलं की, पीडित तरुणी ही पुण्यात कामाला आहे. ती फलटणला गावाला जात होती. गावी जाण्यासाठी जिथे बस सुटतात तिथे ती बसली होती. तेव्हा आरोपी तिच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठं जायचं असं विचारलं. तेव्हा तिने फलटणला जातेय, असं सांगितलं. तेव्हा त्याने साताऱ्याला जाणारी बस येथे लागत नाही असं सांगून दुसरीकडे नेले.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
पीडित तरुणीनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. मात्र त्याने दाखवलेल्या बसमध्ये अंधार पाहून तिने प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्याने ही रात्रीची बस असून आतमध्ये प्रवासी झोपलेले आहेत, त्यामुळे अंधार आहे असं सांगून तिला विश्वास दिला. त्यानंतर ती बसमध्ये गेली तेव्हा त्याने तिला आत ढकलून बसचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
अतिप्रसंगाची घटना घडल्यानंतर पीडित तरुणी तिच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसली. तेव्हा रस्त्यात असताना तिने तिच्या मित्राला या घटनेबद्दल सांगितलं. त्याने तिला पोलिसांत तक्रार दाखल कर, असा सल्ला दिला तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरु केला आहे. आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवाशी आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत असून आरोपीला शोधण्यासाठी 8 टीम तयार करण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.  पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा शिरुर गावातला आहे असं कळलं आहे. त्याची ओळख पटली आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
निलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी पोलिसांना काही सूचना दिल्या आहेत. मी पोलिस अधिकारी आणि एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. एफआयआरही वाचला आहे. परिवहन मंत्री यांच्यासोबत बोलले आहे. बंद बसमध्ये हा प्रकार झाला आहे. मी आता काही सूचना दिल्या आहेत. मी पाहणी केली बस मधून आवाज बाहेर येत नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Pune woman raped inside stationary bus at Swargate bus stand

Serial offender rapes woman in stationary state transport bus in Pune

शिवशाही बसमध्ये गावाला जाणार्‍या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात घटना @पुणे
@महाराष्ट्र पुणे-स्वारगेट स्थानकातील CCTV आलं समोर. आरोपीचा चेहराही उघड झाला...

Support belgavkar