अफगाणिस्तानचा रंगतदार सामन्यात 8 धावांनी विजय, इंग्लंडचं पराभवासह पॅकअप. AFG beat ENG by 8 runs in Lahoreलाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या 300 पारच्या लढाईत अफगाणिस्तानच्या संघानं इंग्लंडच्या संघाला झुकवलं आहे. 'अफगाणिस्तान नाम सुनके फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर है' असा शो दाखवत अफगाणिस्ताननं इंग्लंडला रोखत सेमीतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह इंग्लंडचा स्पर्धेतील आशा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकाचा सेमीचा प्रवासही सोपा झालाय.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने इब्राहीम झाद्रान याच्या 177 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या धावांचा शानदार पाठलाग करत 49 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 313 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची तर अफगाणिस्तानला 1 विकेटची गरज होती. गरज होती. मात्र अझमतुल्लाह ओमरझई याने शेवटच्या ओव्हरमधील 4 चेंडूत 4 धावा दिल्या. तर पाचव्या चेंडूवर आदिल रशीद याला इब्राहीम झाद्रान याच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लंडचा डाव यासह 49.5 ओव्हरमध्ये 317 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने अशाप्रकारे विजय मिळवला. तर या पराभवासह इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून अधिकृतरित्या बाहेर झालीय.
इब्राहिम झाद्रानचे (177) शानदार शतक आणि अझमतुल्ला ओमरझाई (41 धावा आणि 5 विकेट) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लिश संघाचा अवघ्या 8 धावांच्या फरकाने पराभव केला.अफगाणिस्तानच्या 18 नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला 326 धावांचं टार्गेट दिलंलाहोरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या ताफ्यातून 18 नंबर जर्सी घालून मैदानात उतरलेल्या इब्राहिम झाद्रान (Ibrahim Zadran) याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याच्या शतकी खेळीशिवाय कॅप्टन हश्मतुल्लाह शहिदी आणि नबीच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघानं 'करो वा मरो' लढती निर्धारित 50 षटकात 7 बाद 325 धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शहिदी याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. गुरबाझ 6 (15), सेदीकुल्ला अटल 4 (4) आणि रहमत शाह 4 (9) यांच्या रुपात संघाला धक्क्यावर धक्के बसले. एका बाजूला विकेट पडत असताना सलामीवीर इब्राहिम झाद्रान तग धरून मैदानात उभा राहिला. त्याला कॅप्टन शाहिदीची साथ मिळाली आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचत अफगाणिस्तानच्या संघाचा डाव सावरला. हश्मतुल्लाह शहिदी 67 चेंडूत 40 धावांची खेळी करुन माघारी फिरला.
मग त्याला ओमरझाई अन् मोहम्मद नबीची मिळाली साथइब्राहिम झाद्रान याने अझमतुल्लाह ओमरझाईसोबत पाचव्या विकेटसाठी 92 धावांची दमदार भागीदारी केली. यात ओमरझाईनं 31 चेंडूत झटपट 41 धावा ठोकल्या. तो माघारी फिरल्यावर अनुभवी मोहम्मद नबीनं त्याला साथ दिली. सहाव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या 10 षटकात 55 चेंडूत दोघांनी 111 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंड विरुद्धची लढाई 300 पार धावांची केलीये. इब्राहिम झाद्रान अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याने 146 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 177 धावा ठोकल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ही कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. मोहम्मद नबीनं 24 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत 40 धावांचे योगदान दिले.
