apologizes for any shortcoming in servicesशिवरात्रीच्या स्नानानंतर कुभमेळ्याची सांगता झाली आहे. प्रयागराज येथे 45 दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यधी भावीकांनी येऊन संगमावर पवित्र स्नान केले. कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे. तसेच, या भव्यदिव्य आयोजनात सहभागी झाल्याबद्दल भाविकांचे आभारही मानले. याशिवाय, त्यांनी भाविकांना झालेल्या असुविधेबद्दल माफीही मागितली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
पंतप्रधान मोदींनी का मागीतली माफी?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Narendramodi.in वर लिहिलेल्या एका लेखात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे, 'मला माहीत आहे, एवढे मोठे आयोजन सोपे नव्हते. मी, माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वती यांच्याकडे प्रार्थना करतो की, आमच्या उपासनेत काही कमतरता राहिली असेल तर कृपया करून आम्हाला क्षमा करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ही इश्वराचे रूप आहे. माझ्याकडून भाविकांच्या सेवेतही काही कमतरता राहिली असेल, तर मी जनतेलाही क्षमा मागतो.'Click Here to Watch Videos or See More Photos
कुंभमेळ्यासंदर्भात काय म्हणाले, पंतप्रधान मोदी?यानंतर, एका पाठोपाट एक केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, '140 कोटी देशवासियांची श्रद्धा जेव्हा एकाच वेळी एका ठिकाणी येते, तेव्हा ते दृष्य अविस्मरणीह बनते. प्रयागराजमधील कुंभमेळ्यादरम्यान आपण हेच अद्भूत दृश्य बघितले. हे आयोजन म्हणजे, केवळ एक धार्मिक उत्सवच नाही तर, आपल्या सांस्कृतीक ऐक्याचे आणि अखंडतेचे प्रतिक आहे. जेव्हा एखादे राष्ट्र शतकानुशतकांची गुलामगिरीची मानसिकता तोडून पुढे वाटचाल करते आणि मोकळा श्वास घेते, तेव्हा ज्या पद्धतीचे दृश्य दिसते, अगदी तसेच दृश्य आपण कुंभमेळ्यात बघितले.'
45 दिवस चाललेल्या या कुंभमेळ्यात 66.30 कोटी भाविकांनी केले पवित्र स्ननगेल्या 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी झाला. एकूण 45 दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्यात जवळपास 66.30 कोटी भाविकांनी गंगेच्या पात्रात आणि संगमावर स्नान केले. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 1.53 कोटींहून अधिक भाविकांनी येते स्नान केले.
