गोव्यात 450 वर्षे पोर्तुगिजांचे राज्य नव्हते. केवळ तीनच तालुक्यांवर पोर्तुगिजांची 450 वर्षे राजवट होती आणि इतर तालुक्यांवर शिवरायांची शिवशाही होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच गोव्यातील धर्मांतरणाला चाप बसला, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिवजंयतीच्या निमित्ताने केले.
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलेला हा इतिहास खोटा असून इतिहासाशी हेळसांड केल्याचा आरोप कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
उदय भेंब्रे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देणारा एक सविस्तर व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भेंब्रे यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात केलेले विविध दावे खोडून काढले आहेत. भेंब्रे यांनी मुख्यमंत्री यांच्या भाषणातील प्रामुख्याने दोन मुद्यांवर सविस्तर भाष्य केले आहे. गोव्यात शिवशाही होती का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील धर्मांतरण खरचं थांबले का? यावर भेंब्रे यांनी इतिहासातील संदर्भ देत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
गोव्यात शिवशाही होती का?याबाबत बोलताना भेंब्रे यांनी, गोव्यात 1510 साली पोर्तुगिजांनी सुरुवातीला तिसवाडी तालुका ताब्यात घेतला. त्यानंतर 1530 पर्यंत बार्देश आणि साष्ट (सासष्टी) हे तालुके ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे दोनशे वर्षानंतर पोर्तुगिजांनी लढाई करुन 1763 रोजी फोंडा तालुका जिंकून घेतला. पेडणे, डिचोली आणि सत्तरी हे तालुके सावंतवाडीच्या सावंत भोसले यांच्याकडे होते. दरम्यान, सावंत भोसले आणि कोल्हापूरचा राजा यांच्यात वाद सुरु होता त्यामुळे हे तालुके सावंत भोसले यांनी पोर्तुगिजांकडे सोपवले, असे भेंब्रे यांनी म्हटले आहे.
तसेच, दक्षिणेतील केपे, काणकोण आणि सांगे तालुके सौंदेकार यांच्याकडे होते. पण सौंदेकार आणि हैदरअली यांच्यात वाद सुरु असल्याने सौंदेकार राजाने हे तालुके 3 तालुके पोर्तुगिजांना संभाळण्यासाठी दिले. अशाप्रकारे हे सहा तालुके 1781 ते 1788 या काळात पोर्तुगिजांकडे आले. 6 तालुके पोर्तुगिजांकडे युद्ध न करता आले त्यामुळे त्यांना काबिज केले असे म्हणणे चुकीचे असल्याचे भेंब्रे यांनी म्हटले आहे. 1630 ते 1680 या काळात असलेल्या शिवाजी महाराजांचा या तालुक्यांशी काहीच संबंध नाही. पण, या विचार करण्याचे कष्ट मुख्यमंत्री सावंत यांनी घेतले नाही, असे उदय भेंब्रे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणतात तसे शिवशाही होते असे मानले तरी याची इतिहासात नोंद सापडत नाही. शिवशाहीतील तालुके संभाळण्याची जबाबदारी कोणाकडे होती, याबाबत देखील इतिहासात सबळ पुरावे नाहीत, असे भेंब्रे यांनी स्पष्ट केले. इतिहासात नाहीच ते दाखवण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा सवाल देखील भेंब्रे यांनी उपस्थित केला.
धर्मांतरण शिवरायांमुळे थांबले नाहीगोव्यात धर्मांतरण 1540 रोजी सुरु झाले. ते देखील केवळ तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी या तालुक्यांमध्ये सुरु झाले. या तालुक्यांत त्यावेळची लोकसंख्या दीड ते दोन लाखांच्या जवळपास होती. येथे धर्मांतरणासाठी पोर्तुगिजांना चार पिढ्या लागल्या असे समजले तरी शंभर वर्षे होतात. म्हणजेच 1640 रोजी धर्मांतरण थांबले.
