या आजारावर रामबाण ठरु शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट

या आजारावर रामबाण ठरु शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट

belgavkar.com | belgaum | belgavkar

रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा....

योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका ग्लोबल रिसर्च रिपोर्टनुसार, पतंजलीचे Herbo- Mineral औषध 'थायरोग्रिट'वर संशोधन करण्यात आले आहे आणि हायपोथायरॉइडीझमच्या उपचारात हे औषध उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे संशोधन उंदरावर करण्यात आले आहे. या संशोधनात, हे औषध उंदरातील हायपोथायरॉइडीझमची समस्या बरी करण्यास प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
महत्वाचे म्हणजे, थायरॉग्रिट हे आयुर्वेदिक औषध हायपोथायरॉईडीझमने प्रभावित थायरॉईडपासून मुक्त करू शकते, असा दावा दावा पतंजलीने केला आहे. पतंजलीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'हे संशोधन जागतिक पातळीवरील प्रसिद्ध क्लिनिकल फायटोसायन्समध्ये प्रसिद्ध आहे आहे. हे सांगताना पतंजलीला अत्यंत आनंद होत आहे. यामुळे वैज्ञानिक आणि संशोधकांनाही नव्या आयुर्वेदिक औषधी रिसर्चसंदर्भात माहिती मिळेल.'
आचार्य बालकृष्ण म्हणाले, पतंजलीचे हे यश जगभरातील थायरॉइड पीडित लोकांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे.  पतंजलीशी संबंधित सर्व लोक जगाला रोगमुक्त करण्यासाठी समर्पित. हायपोथायरॉईडीझम हा जगभरात एखाद्या सामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. यामुळे हृदयविकार, वंध्यत्व आणि मुलांच्या मेंदूच्या विकासात अडथळा यांसारखे दुष्परिणाम होत आहेत.

Patanjali’s ‘Thyrogrit’ promises research backed breakthrough in Hypothyroidism treatment

Patanjali Ayurved Limited produces quality Herbomineral preparations

या आजारावर रामबाण ठरु शकतं पतंजलीचं 'थायरोग्रिट' प्रोडक्ट
रिसर्च रिपोर्टमध्ये मोठा दावा....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm