Champions Trophy 2025, AFG vs AUS, Lahore Stadium | pitch at Gaddafi Stadiumचॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्याचा विजेता संघ ब गटातून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरणार होता. परंतु, या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 12 षटके झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पाऊस व ओल्या खेळपट्टीमुळे सामना खेळवता आला नाही. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. मात्र, या सामन्यातील ढिसाळ नियोजनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची समाजमाध्यमांवर थट्टा उडवली जात आहे.Click Here to Watch Videos or See More Photos
या सामन्यात अफगाणिस्ताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 273 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 274 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरला. कांगारुंच्या संघाने 12.5 षटकात एका गड्याच्या बदल्यात 109 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर पाऊस सुरु झाला. पावसाने बराच वेळ बॅटिंग केली. त्यानंतर पाऊस थांबला. त्यामुळे सामना परत सुरु होईल असं वाटू लागलं होतं. ग्राउंड स्टाफकडून खेळपट्टी व मैदान कोरडं करण्याचे प्रयत्न चालू होते. मात्र, या कामात त्यांना यश मिळालं नाही. मैदान कोरडं करण्यासाठी गद्दाफी स्टेडियमचे कर्मचारी चक्क स्पंजचा वापर करत होते. स्पंजने खेळपट्टी पुसून पाणी बादलीत पिळून काढण्याचं काम चालू होतं. हा प्रकार पाहून नेटकऱी यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची थट्टा उडवू लागले आहेत.
नेटकऱ्यांनी अनेक मिम्स शेअर करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मैदान व खेळपट्टी कोरडी करण्यासाठी अद्ययावत व पुरेशी साधनसामग्री अथवा त्यासाठीची यंत्रणा नसल्यामुळे हा सामना परत सुरु होऊ शकला नाही असा दावा नेटकरी करत आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाऊसामुळे रद्द करण्यात आला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर बराच वेळ थांबून मैदान सामन्यासाठी पुन्हा तयार होते की नाही, याचे पंचांनी निरिक्षण केले. परंतु, लाहोर गद्दाफी मैदानावर प्रचंड पाणी असल्याने सामना रद्द करण्यात आला. भारतीय वेळेनुसार रात्री 9.20 वाजता पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली. या निकालाचा अर्थ ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. त्याचवेळी अफगाणिस्तान संघ अजूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 4 गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे, तर अफगाणिस्तानचा संघ 3 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचा संघही 3 गुणांसह अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे आता अफगाण संघाला 1 मार्च 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या विजयाची अपेक्षा असेल, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेचा रन रेट कमी होईल आणि टेम्बा बावुमाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरेल.
अफगाणिस्तानची जोरदार टक्कर : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, अफगाणिस्तानने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत सन्मानजनक 273 धावांपर्यंत मजल मारली. सदिकउल्ला अटलने 95 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्ला ओमरझाईने वादळी खेळी केली आणि संघाची धावसंख्या 250 पार नेऊन ठेवली. ओमरझाईने 63 चेंडूत 5 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 67 धावा केल्या.
