बेळगाव—belgavkar—belgaum : ऑटोनगर येथील एका गॅरेजला आग लागली होती. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून आगीत सुमारे 8 ते 10 कार जळून खाक झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे.
कार गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता गॅरेज बंद केले होते. सायं. 7 वाजण्याच्या सुमारास गॅरेजमधून अचानक धूर आला. बघता बघता आगीचा भडका उडाला. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. गॅरेजचे पत्रे तुटून पडले आहेत. अधिक माहितीनंतरच नेमके कितीचे नुकसान झाले आहे? याची माहिती मिळणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
