महाराष्ट्र : रावेर लोकसभेच्या खासदार, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी 4 टवाळखोरांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुक्ताईनगर कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये धक्कादायक प्रकार
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. खडसे यांच्या कन्येसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केली. त्यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा व्हिडिओ काढला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचीच छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कोथळीच्या जत्रेत हा प्रकार घडला आहे.
भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रक्षा खडसे यांनी आपल्या मुलीसह अन्य मुलींना घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी होती. 'आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय,' असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी पोलिसांनी विचारला आहे.नेमकं काय घडलं?दरम्यान, आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते. या दिवशी विविध कार्यक्रम असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही येथे फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता, त्यानंतर रक्षा खडसे यांच्या कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली. यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला. व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु त्याने सुरक्षारक्षकाशी झटापट केली.
