Bolivia is a country in central South America, with a varied terrain spanning Andes Mountains, the Atacama Desert and Amazon Basin rainforestबोलीव्हिया येथे झालेल्या भीषण अपघातात 37 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 39 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, बस चुकीच्या लेनमधून जात होती, त्यावेळी समोर आलेल्य बसने जोरदार धडक दिली. त्यामळे भीषण अपघात झाला अन् जागेवरच 37 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 39 जण जखमी झाले आहेत, त्यामधील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
accident on the route between the cities of Uyuni and Colchaniबोलीव्हिया येथील पोटोसी परिसरात बसचा भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला, तर 39 जण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातामधील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसचा हा भीषण अपघात स्थानिक वेळेनुसार, शनिवारी सकाळी सात वाजता झाला. उयूनी आणि कोलचानी यादरम्यान दोन बसची जोरदार धडक झाली. रिपोर्ट्सनुसार, उयूनी सालार येथील प्रवेशद्वार अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. दररोज हजारो पर्यटक भेट देतात. पर्यटनासाठी आलेली बसने जोरदार धडक दिली, त्यामुळे भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये 39 जणांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यामधील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. 39 रुग्णांवर चार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
