पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या बचाव, सुधार आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनताराचे उद्घाटन करण्यात आले. याच निमित्ताने पीएम मोदींनी गुजरातच्या वनतारा प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली. वनतारा 2 हजार प्रकारच्या प्रजाती, दीड लाख प्राण्यांचं घरटं आहे. या सर्वच प्राण्यांचा बचाव करून त्यांना येथे आश्रय देण्यात आला. यात प्रामुख्याने लोप पावत असलेल्या प्राण्यांचा समावेश आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
Vantara is home to more than 2,000 species and over 1.5 lakh rescued, endangered, and threatened animals. It is spread over 3000 acres in the Reliance Jamnagar refinery complex and is a state-of-the-art animal rescue and rehabilitation centre.Click Here to Watch Videos or See More Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी असलेल्या विविध सुविधा केंद्रांना भेट दिली. तसेच येथे संवर्धन केले जात असलेल्या विविध प्रकारचे प्राणी आणि त्या प्राण्यांच्या प्रजातींना प्रत्यक्ष भेटून आढावा घेतला. वनतारा येथे उपलब्ध असलेल्या रुग्णालयासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली. या रुग्णालयात चक्क प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन आणि आयसीयूची सुविधा आहे. यासोबतच, या विशेष रुग्णालयात वन्य प्राण्यांसाठी एनेस्थीशिया, कार्डिओलॉजी, नेफरोलॉजी, एंडोस्कोपी, डेन्टिस्ट्री आणि इंटरनल मेडिकल इत्यादी स्वतंत्र विभागसुद्धा आहेत.
या ठिकाणी पीएम मोदींनी अतिशय दुर्मिळ अशा आशियाई सिंहांचे बछडे, पांढऱ्या सिंहाचे बछडे आणि क्वाउडी बिबट्यांच्या बछड्यांना आपल्या हातांनी दूध पाजले. पंतप्रधानांनी वनतारा रुग्णालयाच्या एमआरआय कक्षालाही भेट दिली. येथे एका आशियाई सिंहाचा एमआरआय केला जात होता. ते ऑपरेशन थिएटरमध्येही गेले. येथे एका बिबट्यावर शस्त्रक्रिया सुरु होती. त्याला एका कारने धडक दिली होती त्यात तो जखमी झाला होता.
पंतप्रधानांनी यावेळी ओकापीला थाप दिली तसेच खुल्या वातावरणात चिंपांझींशी सामना केला. या चिंपाजींना पाळीव प्राणी म्हणून ठेवले जात होते. तिथून त्यांची सुटका करुन त्यांना वनतारा येथे आणण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी चिंपांजींना मिठी मारली आणि प्रेमाने खेळले. पाणघोड्याला जवळून पाहिले, मगरींचे निरीक्षण केले, झेब्रा असलेल्या ठिकाणी फिरले आणि जिराफ आणि गेंड्याच्या वासराला खायला घातले. एक शिंगी गेंड्याच्या वासराजवळ गेले ज्याची आई काही दिवसांपुर्वीच मृत पावली होती.
