परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या कारसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. External Affairs Minister (EAM) S Jaishankar 4 मार्च ते 9 मार्च या कालावधीत ब्रिटनच्या दौऱ्यावर असून तिथून पुढे दोन दिवसांचा आयर्लंडचा दौरा ते करणार आहेत. ब्रिटनमध्ये द्वीपक्षीय संबंध, व्यापारविषयक धोरण, शिक्षण-आरोग्य या क्षेत्रातील सहकार्य या बाबतीत ते चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान एका बैठकीनंतर बाहेर पडताना त्यांच्या ताफ्यासमोर लंडनमधील खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
नेमकं काय घडलं? : बुधवारी संध्याकाळी एस. जयशंकर लंडनमधील चॅथम हाऊसमधील एका बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते बाहेर पडत असताना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तान समर्थक घोषणाबाजी देत होते. विशेष म्हणजे यावेळी लंडन पोलीसही तिथेच उपस्थित होते. पण सर्व पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे (pro-Khalistan protesters outside Chatham House in London).Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
एस. जयशंकर बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसताच समोरच्या आंदोलकांमधून एक खलिस्तान समर्थक त्यांच्या कारसमोर आला आणि तिथेच त्यानं भारताचा राष्ट्रध्वज फाडला. यानंतर तिथे उभ्या असलेल्या लंडन पोलिसांनी त्याला बाजूला नेलं आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा ताफा पुढे रवाना झाला. मात्र, या घडल्या प्रकारामुळे भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. तसेच, यावेळी लंडन पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका का घेतली? त्यांचंही आंदोलकांना समर्थन होतं का? असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.
कसा आहे परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा?एस. जयशंकर 4 मार्च ते 6 मार्च लंडनमध्ये असून त्यानंतर 6 व 7 मार्च या दोन दिवसांत ते आयर्लंडचा दौरा करणार आहेत. लंडन दौऱ्यामध्ये एस. जयशंकर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यात इतर मुद्द्यांसोबतच संरक्षण विषयक सहकार्याच्या मुद्द्यावरदेखील द्वीपक्षीय चर्चा होणार आहे.
