
Attempt to shoot reel turns tragic : Scorpio plunges into Fatehwadi Canal, 2 dead, 1 missingसोशल मीडियावर वारंवार प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुणाई जीव धोक्यात घालत आहे आणि असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार अहमदाबमधून समोर आलाय. ज्यात सोशल मीडियासाठी रिल्स करताना एक गाडी अनियंत्रित होऊन थेट पाण्यात कोसळली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण अपघाताची घटना एक धोकादायक स्टंट (Stunt) करत असताना घडली आहे. जिथे वाहन वेगात चालवत स्टंट करण्याचा प्रयत्न आणि रिल्स करत असताना त्यात वाहन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट बाजूलाच असलेल्या कालव्यात जाऊन कोसळली.
या गाडीत यश, यक्ष आणि क्रिश दवे बसले होते. कालव्यावर यू-टर्न घेत असताना, काही कारणास्तव वळण न घेतल्याने गाडी कालव्यात पडली. अहमदाबादमधील जुहापुरा-सरखेज परिसरातील फतेहवाडी कालव्यात एक घटना घडली जी सर्वांना माहिती असायला हवी. स्कॉर्पिओ कारसह 3 तरुण कालव्यात पडले. सर्वप्रथम, जेव्हा यक्षचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, यक्ष गाडी चालवत होता, पण अपघाताच्या वेळी त्याने यश सोलंकीला गाडी चालवू दिली होती. यक्षाचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांनी यश सोलंकीचाही मृतदेह सापडला. तथापि, अजून दुसऱ्या क्रिश दवेचा कोणताही मागमूस सापडलेला नाही.
सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे अनेक धक्कादायक व्हायरल होत असतात. कधी उंच डोंगरावर रिल्स करत असतात तर कधी बाईकवर उभं राहून स्टंट करतात. बऱ्याचदा तरुणांना हे स्टंट करताना जीव गमवावा लागतो तर कधी समोरच्यांचा ही जीव धोक्यात घालतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्याच्या घटनेचा व्हिडिओ (Video) @RJpooja12 या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहे तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
