बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे बुधवार दि. 12 रोजी आनंदवाडी आखाड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानात कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर भारत, इराण व अमेरिका येथील मल्ल सहभागी होणार आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
बेळगाव केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड वि. सोहेल इराण, बेळगाव मल्लसम्राट किताबासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख वि. विशाल हरियाणा, बेळगाव रणवीर किताबासाठी शिवा महाराष्ट्र वि. ग्रॅडीला अमेरिका तर बेळगाव शौर्य किताबासाठी हादी इराण वि. दादा शेळके यांच्यात लढती होणार आहेत.
या मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगिरी वि. मिलाद इराण यांच्यात आकर्षक कुस्ती होणार आहे. विविध कुस्त्यामध्ये प्रकाश इंगळगी वि. विजय बिचुकले, शिवानंद दड्डी वि. सतपाल नागटिळक, प्रेम जाधव कंग्राळी वि. संकेत पाटील, कामेश कंग्राळी वि. संजू इंगळगी, पार्थ पाटील कंग्राळी वि. शुभम मगर, बाळू शिंदीकुरबेट वि. विजय जाधव, महेश तीर्थकुंडये वि. ओमकार राशीवडे, प्रथमेश कंग्राळी वि. सोहेल शेख कोल्हापूर अशा लहान मोठ्या सुमारे 90 हून अधिक कुस्त्या होणार आहेत.
यंदा आखाड्यात महिला कुस्त्यांचीही मेजवानी मिळणार आहे. कर्नाटक चॅम्पियन स्वाती पाटील (कडोली) वि. हरियाणा चॅम्पियन हिमानी (हरियाणा) यांच्यात लढत होणार आहे. तसेच मनोरंजन कुस्तीसाठी प्रसिद्ध मल्ल देवा थापा दुसऱ्यांदा बेळगावात येणार आहे. या कुस्ती मैदानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी केले आहे.
