Viral Video : मोदींच्या मार्गात आलेल्या मुलाला पोलिसाकडून चोप.... थेट निघाले बदलीचे आदेश, वेतनवाढही रोखली

Viral Video : मोदींच्या मार्गात आलेल्या मुलाला पोलिसाकडून चोप.... थेट निघाले बदलीचे आदेश, वेतनवाढही रोखली

Police SI seen assaulting boy on bicycle in Viral Video transferred, increment put on hold

Surat cop slaps, pulls hair of 17-year-old boy for cycling during PM Modi’s convoy rehearsal

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गात आलेल्या एका मुलाला पोलिस उपनिरीक्षकाने चोप दिल्याची घटना गुरुवारी घडली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आता या पीएसआयला गृह विभागाने शिक्षा दिली आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्याची बदली करुन वेतनवाढही रोखण्यात आली आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
गुजरातमधील सुरतच्या लिम्बायत याठिकाणी ही घटना घडली होती. पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे त्यांचा ताफा जाणार असलेल्या मार्गांवर नेहमीच कडक सुरक्षाव्यवस्था असते. प्रत्यक्ष दौऱ्याआधी संपूर्ण मार्गावर सुरक्षा आणि वाहतुकीची चाचपणी घेतली जाते. ही तयारी सुरु असताना लिम्बायतमध्ये एक शाळकरी मुलगा सायकलवर मार्गात आला होता.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
मार्गावर ड्युटीला असलेले पोलिस उपनिरीक्षक बी. एल. गढवी यांनी संबंधित मुलाला हटकले. गढवी यांनी मुलाच्या तोंडावर ठोसा लगावला. त्याचे केस जोरजोरात ओढले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित पोलिस उपनिरीक्षक गढवी यांना शिक्षा दिली आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
गढवी यांची सुरतमधून मोरबी याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच एक वर्षासाठी त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मोदी शुक्रवारी सायंकाळी लिम्बायत येथे एका कार्यक्रमानिमित्त येणार होते. त्यासाठी गुरुवारी ताफ्याच्या मार्गावर तयारीची चाचपणी घेतली जात होती. यादरम्यान ही घटना घडली.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
लिम्बायतमधील मुख्य रस्त्यावर तयारी सुरु असताना सायकल चालवत असलेला एक मुलगा गढवी यांना दिसला. त्यांनी संबंधित मुलाला थांबवून त्याचे केस पकडले आणि जोरजोरात ओढले. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ एका व्यक्तीने इमारतीवरुन घेतला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सुरत वाहतूक शाखेच्या उपायुक्त अनिता वनानी यांनी सांगितले की, ‘संबंधित पोलिस उपनिरीक्षकांना पंतप्रधानांच्या बंदोबस्तापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांना कंट्रोल रुममध्ये ड्यूटी देण्यात आली आहे.’ त्यानंतर विशेष शाखेचे उपायुक्त हेतल पटेल यांनी प्रसिध्दीपत्रक काढत गढवी यांची मोरबी येथे बदली करण्यात आल्याची माहिती दिली. पोलिस एवढ्यावर थांबले नाहीत. लिम्बायत पोलिसांनी संबंधित मुलाचा शोध घेऊन पोलिस ठाण्यात आणले आणि त्याचा जबाब घेतला. संबंधित मुलगा काही दिवसांपूर्वी नेपाळमधून सुरतमध्ये आला आहे. तो त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Police SI seen assaulting boy on bicycle in viral video transferred increment put on hold

Video : Cop Slaps Boy Pulls Hair For Cycling During PM Convoy Rehearsal

Viral Video boy for cycling during PM Modi’s convoy rehearsal

Viral Video : मोदींच्या मार्गात आलेल्या मुलाला पोलिसाकडून चोप.... थेट निघाले बदलीचे आदेश, वेतनवाढही रोखली
Police SI seen assaulting boy on bicycle in Viral Video transferred, increment put on hold

Support belgavkar