India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : टीम इंडिया ‘चॅम्पियन्स’

India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : टीम इंडिया ‘चॅम्पियन्स’

न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर | 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड Champions Trophy Final 2025 : IND win final by 4 wickets

टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. रोहितसेनेने अंतिम सामन्यात किवींवर 4 विकेट्सने मात करत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 49 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 254 धावा केल्या.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने या विजयासह न्यूझीलंडचा 25 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केला.
पहिल्या डावात काय झालं?
दरम्यान त्याआधी टॉस जिंकून न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि मायकल ब्रेसवेल या दोघांनीा सर्वाधिक धावा केल्या. डॅरेल मिचेल याने 63 तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांचं योगदान दिलं. रचीन रवींद्र याने 37 तर ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. तर टीम इंडियसााठी कुलदीव यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड : टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत एकाही संघाला 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने याआधी 2002 (संयुक्त विजेता) आणि 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर आता 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केलीय.

न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावा केल्या, तर शुबमन गिलने 50 चेंडूत एका षटकारासह 31 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवलं. श्रेयस अय्यर 62 चेंडूत 2 चौकार 2 षटकारांसह 48 धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेलने 40 चेंडूत 1 चौकार 1 षटकारासह 29 धावा करत बाद झाला. तर राहुल आणि हार्दिकने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात 34 धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर ठेवत राहुल नाबाद परतला. यावेळी त्याला हार्दिक पंड्याचीही साथ लाभली ज्याने 18 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
पराभवाची अचूक परतफेड
टीम इंडियाने अंतिम सामन्यात किंवीवर विजय मिळवत 25 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड केली. याच न्यूझीलंडने टीम इंडियाला 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. टीम इंडियाने आता किवींना पराभूत करत परतफेड केली.
टीम इंडियाचा दुबईतील 10 वा विजय
टीम इंडियाने या विजयासह दुबईत अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम राखला. टीम इंडियाचा हा या स्टेडियममधील 11 वा सामना होता. भारताचा हा दुबईतील 10 वा एकदिवसीय विजय ठरला. तर एकमेव मॅच टाय झाली होती.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Champions Trophy Final 2025 : IND win final by 4 wickets

India vs New Zealand Champions Trophy 2025 Final

India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : टीम इंडिया ‘चॅम्पियन्स’
न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात, 25 वर्षांपूर्वीचा हिशोब क्लिअर | 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी

Support belgavkar