हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून, त्याला भाषिक वादाचा रंग देण्यात येऊ नयेकाही कन्नड टीव्ही चॅनेलसह काहीजण सोशल मीडियावर मराठी-कन्नड भाषेच्या मुद्द्यावर समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भाषा द्वेष पसरवत आहेत ही वाईट गोष्ट आहे. मराठी-कन्नड भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांचं तुम्ही काही विचारात घेवू नका आणि आपण सर्वांनी शांतता राखूया आणि सुसंवाद साधूया.
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या (गोजगा, मण्णूर, आंबेवाडी) सचिवावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी बेळगाव तालुक्यातील गोजगा गावाजवळ (गोजगा - मण्णूरच्या मध्ये) आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सचिव (secretary) नागप्पा कोडली यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून हल्लेखोर पळून गेले आहेत.
दुचाकीवरून जाणाऱ्या सचिव नागप्पा यांच्यावर हल्ला करण्यात आला. असे म्हटले जाते की नागप्पावर पंचायतीत (बेकायदेशीर जमीन) भूखंड तयार करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. असे म्हटले जाते की नागप्पा यांना एक वर्षापासून काहीजण त्रास देत होते.
जेव्हा त्याने तसे करण्यास नकार दिला तेव्हा दुचाकीवरून येताना त्यांना अडवण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला ग्रामपंचायतीशी संबंधित एकाने काही सहकार्यांसह केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या नागप्पा यांच्यावर सध्या बीम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
