flight en route to Delhi from Chicago was forced to return to the US's Chicago - majority of the 12 toilets onboard became unserviceableदिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील शौचालये तुंबल्यामुळे वैमानिकाला आपत्कालीन यू-टर्न घेऊन पुन्हा शिकागोला परतावे लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांना सुमारे 10 तास विमानात अडकून पडावे लागले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दरम्यान विमान उतरल्यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एएनआयने एअरलाइनच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिली आहे. तांत्रिक अडचण आल्याने 6 मार्च रोजी शिकागो ते दिल्ली प्रवास करणारे AI126 विमान शिकागोला परतले. शिकागो येथे उतरल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचार्यांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती एअरलाइन्सने दिली आहे.
5 मार्च रोजी एअर इंडियाची फ्लाईट 126 ग्रीनलँडवरून जात असताना विमानातील 12 पैकी 11 टॉयलेट तुंबले. वापरात असलेले टॉयलेट बिझनेस क्लास सेक्शनमध्ये होते, जिथे सुमारे 300 प्रवासी याचा वापर करत होते. दरम्यान विमान प्रवासादरम्यान वैतागलेल्या प्रवाशांचा कॅबिन क्रूशी संवादाचा व्हिडीओ समोर आला असून तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक प्रवाशी त्यांच्या तक्रारी मांडताना दिसत आहेत.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
@dom_lucre या नावाच्या एक्स हँडलने या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विमानातील शौचालये तुंबणे ही असामान्य बाब नाही, जेव्हा प्रवासी परवानगी नसलेली एखादी वस्तू पाईपमधून खाली टाकतात तेव्हा ही समस्या उद्भवते. शौचालयांची संख्या मर्यादित असल्याने विमानातील फक्त एक किंवा दोन शौचालये जरी तुंबली तरी कर्मचार्यांना विमान परत फिरवण्यासाठी ते पुरेसे असते, असेही या यूजरने म्हटले आहे.
Flushed polythene bags, clothes blocked plumbing : Air India on plane toilet messदरम्यान विमान शिकागो येथे उतरल्यानंतर सर्व प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची राहण्याची सोय करण्यात आली असे एअर इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटल्याचे न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे. यापूर्वी देखील टॉयलेटमध्ये समस्या आल्याने विमान परत वळवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये जर्मनीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाचे शौचालय केबिनमध्ये ओव्हरफ्लो झाल्यामुळे विमान वळवण्यात आले होते.
