Fact Check : तो व्हिडीओ अफगाणिस्तानचा

Fact Check : तो व्हिडीओ अफगाणिस्तानचा

पण त्याचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही

2025 Champions Trophy : Here’s The Truth Behind Viral Videos Claiming To Show Celebrations In Afghanistan After India’s Win

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानमधील एका सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला आहे.
Claimed By : Facebook And X Users Fact Check : चूक
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर भारतात मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला. पण, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
हा व्हिडीओ अफगाणिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या लोकांनी भारताच्या विजयाचा जल्लोष रस्त्यावर उतरुन उत्साहात साजरा केल्याचा दावा करण्यात आला आहे.  या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या क्लिप्स जोडण्यात आल्या आहेत. यात अनेक लोक फटाके फोडत आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी पोस्ट शेअर करत या कॅप्शनमध्ये, अफगाणिस्तानची राजधानी काबुल मध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी भारतीयांच्या विजयाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे म्हटले आहे. सर्व फुटेज पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाखवले जात आहेत आणि लोकांना अभिमान वाटत आहे की विरोधी देश असूनही, भारताने मुस्लिम अफगाणांना आपले मित्र बनवले आहे. या कॅप्शनसह हा व्हिडीओ फेसबुक आणि एक्सवर खूप शेअर केला जात आहे.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
पण, फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की या सेलिब्रेशन व्हिडिओचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवल्यानंतर अफगाणिस्तानात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सत्यता कशी पडताळली?
व्हायरल व्हिडिओमध्ये '@zekria.zeer' या इंस्टाग्राम हँडलचा वॉटरमार्क दिसत आहे. हा व्हिडीओ 27 फेब्रुवारी 2025 रोजी या हँडलवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाशी संबंधित असू शकत नाही.... कारण तो आधीच इंटरनेटवर उपलब्ध आहे, यावरुन हे सिद्ध होते.

इंस्टाग्राम पोस्टमधील व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनवरून असे समजते की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले तेव्हा हा आनंद अफगाणिस्तानात साजरा झाला होता. @zekria.zeer नावाचा हा वापरकर्ता देखील अफगाणिस्तानचा आहे. या प्रोफाइलच्या बायोमध्ये लिहिले आहे की झेकरिया हे एक छायाचित्रकार आहेत आणि ते अफगाणिस्तानातील जलालाबादचे रहिवासी आहेत. या व्हिडिओबद्दल आम्ही झकारियाशीही बोललो. ते म्हणाले की, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवल्यानंतर जलालाबादच्या रस्त्यांवर जल्लोष झाला. हा व्हिडीओ त्याने शूट केलेल्या त्याच सेलिब्रेशनचा आहे. हा सामना 26 फेब्रुवारी रोजी लाहोर येथे खेळला होता. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला 8 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला.  भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानात काही सेलिब्रेशन झाले की नाही हे आपण येथे सांगू शकत नाही पण व्हायरल होणारा व्हिडीओ अशा कोणत्याही सेलिब्रेशनचा नाही.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Fact Check celebration video is from Afghanistan but it has nothing to do with India winning the Champions Trophy

2025 Champions Trophy : Here’s The Truth Behind Viral Videos Claiming To Show Celebrations In Afghanistan After India’s Win

Fact Check : तो व्हिडीओ अफगाणिस्तानचा
पण त्याचा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याशी काहीही संबंध नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm