Union Minister Amit Shah promises grand Sita Mata Templeगुजरातमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जाहीर केले की मिथिलामध्ये लवकरच सीता मातेचे भव्य मंदिर उभारले जाईल, जे संपूर्ण जगाला नारी शक्तीचा संदेश देईल. त्यांनी गुजरातच्या विकासामध्ये मिथिलांचल आणि बिहारच्या लोकांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी असेही सांगितले की या प्रदेशाचा प्राचीन काळापासूनच लोकशाही आणि तत्त्वज्ञानाच्या सशक्तीकरणात महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
गांधीनगरमध्ये ‘शाश्वत मिथिला महोत्सव 2025’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी सीता मातेचे मंदिर उभारणार असल्याचे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी वचन दिले की लवकरच सीता मातांचे भव्य मंदिर उभारले जाईल. अमित शाह हे लोकसभा निवडणुकीदरम्यान जेव्हा ते बिहारमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी राम मंदिर उभारले गेले आहे, आता सीता मातांचे भव्य मंदिर उभारण्याची वेळ आली आहे, असे सांगितले होते.
अमित शाह म्हणाले की, सीता मातेचे मंदिर संपूर्ण जगाला नारी शक्तीचा संदेश देईल आणि जीवन कशाप्रकारे आदर्श बनवावे याचे मार्गदर्शन करेल. संपूर्ण जगासाठी हे मंदिर प्रेरणास्थान ठरेल. गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या मिथिलांचल आणि बिहारच्या लोकांची स्तुती करताना शाह म्हणाले की, या लोकांनी गुजरातच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सांगितले की मिथिलाची भूमी रामायण आणि महाभारताच्या काळापासूनच बुद्धिजीवींनी समृद्ध आहे. हे प्राचीन लोकशाहीचा जन्मस्थळ आहे.
अमित शाह म्हणाले की, महात्मा बुद्धांनी अनेकदा म्हटले होते की जोपर्यंत विदेह साम्राज्यातील लोक एकत्र राहतील, तोपर्यंत त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही. त्यामुळे मिथिलांचल लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी एक प्रेरणादायी शक्ती ठरले आहे. तसेच, शास्त्रार्थाची परंपरा देखील मिथिला भूमीतूनच विकसित झाली आहे. भारतातील सहा प्रमुख तत्त्वज्ञानांपैकी चार तत्त्वज्ञान मिथिलांचलमध्ये जन्मले आहेत.
गुजरातच्या विकासात बिहारींचे योगदानशाह यांनी सांगितले की, संवादातून समाधान शोधण्याची परंपरा ही मिथिलाच्या भूमीतूनच विकसित झाली आहे. गुजरातच्या विकासामध्ये बिहारच्या, विशेषतः मिथिलावासीयांचे मोठे योगदान आहे.शहांनी गांधीनगरमध्ये त्यांनी ‘शाश्वत मिथिला भवन’ चे उद्घाटन केले आणि महाकवी विद्यापती यांची भव्य प्रतिमा अनावरण केली. शाह म्हणाले की हे भवन माता सीता, विदुषी भारती, गार्गी आणि मैत्रेयी यांच्या ज्ञान व सामर्थ्याने प्रकाशित मिथिलाची संस्कृती आणि परंपरा जपणारे महत्त्वाचे केंद्र बनेल.
