बेळगाव : @गणाचारी_गल्ली #वाद #तणाव

बेळगाव : गणाचारी_गल्ली वाद तणाव

वादावादीत 2 युवक जखमी
सामाजिक कार्यकर्ते सुदेश लाटेही जखमी

(बकरी मंडई) महापालिकेकडून 20 लाख रुपये मंजूर | सामुदायिक भवन इमारत जागेवरुन वाद

गेल्या आठवड्यातील घटनाक्रम : बकरी मंडईची जागा राखीव ठेवावी, बांधकाम होऊ नये अशी मागणी - दुसर्‍या गटाचे महापालिका कार्यालयासमोर आंदोलन
नगरसेवक शंकर पाटील - आपल्याविरोधात खोटे आरोप Video समुदाय भवन महापालिकेचे
सोमवार : गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईच्या खूल्या जागेत समुदाय भवन उभारण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी (गणाचारी गल्ली) सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला
मंगळवार : गणाचारी गल्ली येथे काही जणांनी वाद घातला, अनेकांना मारहाण
बेळगाव—belgavkar—belgaum : गणाचारी गल्ली येथील बकरी मंडई येथे (महानगरपालिका) सामुदायिक भवन इमारतीच्या जागेवरुन झालेल्या वादात 2 युवक जखमी झाल्याची घटना बेळगावी शहरातील गणाचारी गल्ली येथे घडली. राजू तलवार आणि सामाजिक कार्यकर्ते सुदेश लाटे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून दोघांनाही उपचारासाठी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
महानगरपालिकेच्या जागेवर सामुदायिक भवन बांधण्यात येणार असून यासाठी महापालिकेकडून 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत. याला काही जणांनी विरोध केला आहे. त्यामुळे सरकारी जमिनीवर स्थानिकांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून इमारत बांधण्याची कार्यवाही केली. सायंकाळी याठिकाणी काही जणांनी वाद घातला असून अनेकांना मारहाण झाली आहे, तसेच यावेळी तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. पोलिसांनीही बळाचा वापर केला असून जमावाला पांगविले आहे.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
मंगळवारी दुपारी महापालिका आणि सीटी सर्व्हेचे अधिकारी बकरी मंडईतील जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित करण्यासाठी आले होते. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित केली. मात्र दुपारपासूनच दोन्ही गटातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने त्याठिकाणी जमले होते. अधिकारी मोजमाप उरकून निघून गेले तरीदेखील दोन्ही गटातील नागरिक मात्र बकरी मंडईत थांबून होते. जागेच्या वादातून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी काठी, बियर बॉटल्स, दगड फेकण्यासह लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याने दोन गटातील पाचहून अधिक जण जखमी झाले. यापैकी गणाचारी गल्लीतील सुदेश आणि राजू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बकरी मंडईची जागा राखीव ठेवण्यात यावी, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ नये अशी मागणी दुसर्‍या गटाने केली आहे. काहींनी बकरी मंडईत समुदाय भवन उभारण्यात येऊन नये, अशी मागणी करत महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्याच दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरसेवक पाटील यांनी आपल्याविरोधात खोटे आरोप करण्यात येत आहेत. आरोप करणारे स्थानिक लोक नाहीत, असे सांगत मोर्चा सोमवारी मोर्चा काढला आणि आज मंगळवारी वाद झाला.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news 2 youths injured in Samuday Bhavan building Ganachari Galli

Samuday Bhavan building Ganachari Galli

belgavkar news belgaum

बेळगाव : @गणाचारी_गल्ली #वाद #तणाव
वादावादीत 2 युवक जखमी; सामाजिक कार्यकर्ते सुदेश लाटेही जखमी

Support belgavkar