ठाकरे गटाचा दणका, थेट कार्यालयात घुसून…VIDEO व्हायरलViral Video : 'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला तुम्हाला मराठी कर्मचारी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. का एकही मराठी माणूस नाही, असा सवाल करत धारेवर धरले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला असतानाच एक व्हिडीओ समोर आला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार घेऊन गेलेल्या तरुणाने मराठी बोला, अशी विनंती केली. त्यावर ती तरुणी म्हणाली की का मराठीत बोलू. तुम्हाला हिंदीत बोलता येत नाही का? त्यानंतर बराच गोंधळ झाला.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
क्यू मराठी आना चाहिए? : तरुणी तिच्या वरिष्ठांना म्हणत आहे की, हा व्हिडीओ बनवतोय आणि महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे म्हणतोय. मराठी का आलं पाहिजे. असं कुठे लिहिले आहे? असा उलट सवाल तरुणी मराठी तरुणाला करत आहे. आम्ही भारतात राहतो. भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. त्यानंतर तिथे एअरटेलचे वरिष्ठ अधिकारी आला.
एअरटेलच्या गॅलरीत मराठी बोलणारे का नाहीत?ठाकरेच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आणि इतर पदाधिकारी एअरटेलच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांनी एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण-तरुणी ठेवायला अडचण आहे काय? काही अडचण नाहीये, तर मग असं वारंवार का होतंय? आज जो प्रकार घडला, त्या गॅलरीत एकही मराठी मुलगा नव्हता. मुंबईतील एअरटेल च्या कामकाजात मराठी नाही तर मुंबईत एअरटेलची गॅलेरी नाही, असा इशारा अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या अधिकाऱ्याला दिला.
एअरटेल गॅलरीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेकडून दोन्ही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसत आहे.
