बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव तालुक्यातील (होसा - NEW) वंटमूरी गावात धक्कादायक घटना घडली असून, एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत बाचाबाची होऊन न्यू वंटमूरी गावामध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दगडफेक करुन महिलांसह अनेकांना मारहाण करण्यात आली आहे. तसेच मालमत्तेचे नूकसान झाले आहे. जमिनीच्या मुद्द्यावरून दोन कुटुंबांमध्ये दगडफेक आणि मारामारी झाली असून या घटनेतील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांमध्ये हाणामारी होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या गटबाजीत एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर धारदार विळ्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
दोन कुटुंबातील जमिनीच्या वादातून ही दगडफेक झाली. मारुती होन्नूरे आणि परशाप्पा होळीकर यांच्या कुटुंबात भांडण झाले. आरडाओरडा करत संतप्त झालेल्या काही लोकांनी घराच्या छतावर चढून शेजारच्या घरावर दगडफेक केली. या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काकती पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती सुधारली. तसेच जखमी महिला निंग्गव्वा हिला बेळगाव येथील BIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
