बेळगाव—belgavkar—belgaum : थळ देवस्थान (श्री नामदेव चौक) खडेबाजार (शितल हॉटेल जवळ) येथे 1935 पासून पारंपरिक पद्धतीने शिंपी समाजाच्या वतीने होळी पौर्णिमा व धुलीवंदन साजरे केले जाते. या उत्सवाला यंदा 90 वर्षे पूर्ण होत आहेत. तरी परंपरे प्रमाणे यंदा देखील सर्व समाज एकत्रितपणे होळी पौर्णिमा साजरी करणार असतानाचं थळ देवस्थानच्या भिंतीला लागून कचरा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
कचरा टाकणाऱ्या खडेबाजार येथील वाईन शॉपचा कचरा पुन्हा गोळा करून त्यांच्याच दुकानासमोर फेकून देण्यात आला आहे. याप्रकरणी नामदेव देवकी समाजासह भागातील नागरिकांनी कचरा फेकणार्याविरुद्ध कारवाईची मागणी करत वाद घातल्यामुळे शेवटी सदर वाईन शॉपवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाईन शॉपचा कचरा पुन्हा गोळा करून त्यांच्याच दुकानासमोर फेकून देण्यात आला आहे. .
