Murder on CCTV : Haryana BJP leader shot dead in Haryana on Holiहरियाणा : भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शेजाऱ्यानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र जवाहरा असे मृत्यू झालेल्या भाजप नेत्याचे नाव असून, ते भाजपचे मंडळ अध्यक्ष होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दुकानात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपत शहरात ही घटना घडली आहे. सुरेंद्र जवाहरा हे भाजपचे मुंडलानाचे मंडल अध्यक्ष होते. त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. शुक्रवारी (14 मार्च) रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली.भाजप नेत्याच्या हत्येचे कारण काय?सुरेंद्र जवाहरा यांच्या हत्येचे कारणही तपासातून समोर आले आहे. सुरेंद्र जवाहरा यांची हत्या जमिनीच्या वादातून झाली.
सुरेंद्र जवाहरा यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या आत्याची जमीन खरेदी केली होती. त्यावरून वाद सुरु होता.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
काही दिवसांपूर्वी दिली होती धमकी : आरोपीने काही दिवसांपूर्वी सुरेंद्र जवाहरा यांना खरेदी केलेल्या जमिनीवर पाऊलही ठेवू नको, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सुरेंद्र जवाहरा आणि आरोपीमध्ये वादही झाला होता. त्यानंतर शुक्रवारी भाजप नेता सुरेंद्र जवाहरा हे खरेदी केलेल्या शेतात लागवड करण्यासाठी गेले होते, पण आरोपी तिथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाला. नंतर सुरेंद्र जवाहरा तिथून निघून आले.
रात्री साडेनऊ वाजता सुरेंद्र जवाहरा हे त्यांच्या सोनीपत येथील दुकानामध्ये बसलेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. झटापट झाल्यानंतर आरोपीने पिस्तुल काढले आणि त्यांची हत्या केली.
