बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात एका तरुणाची हत्या करून मृतदेह बसस्थानकात फेकल्याची घटना घडली आहे. अनंतपुर गावच्या हद्दीतील चन्नम्मा सर्कल येथील बसस्थानकात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शेजारील मदभावी गावातील अप्पासाब सिद्धाप्पा कांबळे (वय 37) हे सोमवारी कामासाठी महाराष्ट्रात गेले होते.
सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरी पत्नीला फोन करून सांगितले की, मशिन दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ते घरी येवू शकत नाहीत. पण, मंगळवारी सकाळीचं पती आप्पासाब यांचा खून झाल्याचे आढळून आले. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे.