बेळगाव—belgavkar—belgaum : भरधाव बसची ट्रकला धडक बसून बेळगाव-बागलकोट रोडवरील सांबराजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाले. यामध्ये बसचालक व ट्रकचालकाचाही समावेश आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. रामदुर्गहून बेळगावकडे येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसची बेळगावहून नेसरगीला जाणाऱ्या ट्रकला धडक बसली.
बसमधील प्रवासी, विद्यार्थी या अपघातात किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. जितेंद्रसिंग किल्लेदार (वय 53), शंकर पुजेरी (वय 43), जोतिबा कुद्रेमनी (वय 27), विजयलक्ष्मी (वय 19), पूजा (वय 24), वृषभ (वय 19), सुरेश (वय 22), सुमा (वय 30), नेहा (वय 19), आशा (वय 25), बसव्वा (वय 25), नीता (वय 49), लक्कप्पा (वय 28) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.