मोदींकडे बहुमत नसून नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या भरवशावर केंद्र सरकार टिकून आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर केंद्रात देखील सत्ता परिवर्तन होणार असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेचे प्रभारी रमेश चैनिथला यांनी सोमवारी भोकरदन (जालना) शहरात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले (Ramesh Chennithala - Member of the Kerala Legislative Assembly).
पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण केल्यामुळेच अयोध्येत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून आला, महाराष्ट्रात आज सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने काहीच केले नाही म्हणून त्यांना शेतकरी विरोधी तीन कायदे परत घ्यावे लागले देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. भोकरदन येथील काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा सोमवारी शहरातील सिल्लोड रोड वरील किरण पी देशमुख पेट्रोल पंप शेजारी संपन्न झाला. या कार्यक्रमास काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंञी सतेज पाटील, जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे, परतुरचे माजी आमदार सुरेशकुमार जैथलिया, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, नाना गावंडे, महेमुद शेख, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपस्थित होते.