TRAI crack down on Spam Calls and SMS - effective from 1st September 2024 : सतत स्पॅम कॉल येण्याची तक्रार आणि स्पॅम कॉलच्या नावाखाली होणारी लोकांची फसवणूक करण्याप्रकरणी सरकार मोठी कारवाई करणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या संदर्भात नवीन नियम लागू करणार आहे. या नवीन नियमानुसार जर कोणी खासगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंगसाठी कॉल करत असेल तर टेलिकॉम ऑपरेटर्सना त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागणार आहे.
कॉल द्वारे केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी सरकार दीर्घकाळापासून यासंदर्भात काम करत आहे. ट्रायने एक नवीन नियम आणलाय. हा नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे. सरकारने देशातील सर्व दूरसंचार कंपन्यांना याबाबत सूचनाही जारी केल्या आहेत. स्पॅम कॉलच्या नावाखाली सतत फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे येत आहेत. हे लक्षात घेऊन नवा नियम आणण्यात आलाय. या नियमानुसार जर कोणी खासगी मोबाईल नंबरवरून टेलिमार्केटिंगसाठी कॉल करत असेल तर तो नंबर टेलिकॉम ऑपरेटर्सकडून 2 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकला जाणार आहे.