बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : नंदगडची (ता. खानापूर) ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव 12 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. तब्बल 24 वर्षानंतर लक्ष्मीदेवी यात्रा होणार असून धार्मिक कार्यक्रमांना मंगळवारपासून प्रारंभ झाला.
यात्रेच्या पहिल्या धार्मिक कार्यक्रमात नंदगडवासीय सहभागी झाले होते. सर्वप्रथम देवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. वाद्यांच्या गजरात पार पडलेल्या धार्मिक विधीमध्ये गावातील सुहासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. आगामी सहा महिन्यात समस्त गोंधळ घालणे व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
यात्रेदिवशी म्हणजे पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामदेवता लक्ष्मी देवीचे अक्षतारोपण व अन्य महत्त्वाचे धार्मिक विधी होणार आहेत. नंदगडची ग्रामदेवता लक्ष्मी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षता रोपणानंतर देवीचे गावभर भ्रमण होऊन पाचव्या दिवशी ती गदगेवर स्थानापन्न होणार आहे. तत्पूर्वीचे चार दिवस ती गावात ठिकठिकाणी वस्तीला राहणार असून या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रम होणार आहेत.