बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दुसऱ्या समुदायातील एका तरुणाने दगड फेकला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी गल्लीत लोकांची गर्दी होती, तरीही एक भलामोठा दगड फेकल्याने स्थानिकांनी एका तरुणाला पकडून चौकशी केली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
होळीच्या दुसर्या दिवशीचे रंगपंचमी कनेक्शन | ते रंगपंचमीला बुरखा घालून नाचले म्हणून मी दगड फेकला - ताब्यात घेतलेला युवक #कबुलीउज्ज्वल नगर येथील रहिवासी यासिरने (वय 19) बुधवारी रात्री मंदिरावर दगडफेक केली. मंदिराच्या आत प्रवेश करण्याचा आदी उंबरठ्यावर लोखंडी सळ्यांचा दरवाजा असल्याने तो दगड मंदिराच्या दारातचं पडला आणि आत मंदिरातील देवाला लागला नाही. अन्यथा मोठा वाद निर्माण झाला असता.
यावेळी तेथील दुकानदार आणि स्थानिक लोक ताबडतोब धावले आणि त्यांनी यासिरला पकडले. स्थानिक लोक हल्ला करण्याच्या तयारीत असताना, यासिर म्हणाला, 'माझी चूक झाली, कृपया मला माफ करा, मी मंदिरावर दगड फेकले'.
त्यानंतर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी पांगुळ गल्लीमध्ये केएसआरपी पथक तैनात केले आहे. पीएसआयच्या नेतृत्वाखाली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त ईडा मार्टिन मारबानियांग (City Police Commissioner, Belgaum, Sri Iada Martin Marbaniang) यांनी माहिती दिली की काल रात्री मार्केट पोलिस स्टेशन हद्दीतील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिराच्या गेटवर सुमारे 19 वर्षांच्या एका आरोपीने दगड फेकला होता. लगेचच जमावाने त्याला पकडले आणि बांधले.
पोलिसांच्या पथकाने त्याला सुरक्षित केले आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या मुलावर काही काळापासून मानसिक उपचार सुरू आहेत. होळीच्या वेळी बुरख्यासारखा पोशाख परिधान केलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. एकीकडे भाषिक संघर्षामुळे सीमावर्ती जिल्हा बेळगाव तणावपूर्ण आहे, तर दुसरीकडे अशा दुष्कृत्यांच्या कृत्यांमुळे जातीय सलोखा देखील धोक्यात येत आहे. सध्या, तरुणाला अटक करण्यात आली आहे.
