कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ Video; अध्यक्षांसमोर कागदपत्रे भिरकावली

कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ Video
अध्यक्षांसमोर कागदपत्रे भिरकावली

सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
18 आमदारांचे पुढील 6 महिन्यासाठी निलंबन

कर्नाटकमध्ये चांगलंच राजकारण तापलं.... आमदारांनी अध्यक्षांवर भिरकावली कागदपत्रे

मुस्लिम आरक्षण विधेयक अन् हनी ट्रॅपचा मुद्दा तापला
कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण
Ruckus erupts in Karnataka Assembly as BJP MLAs enter the Well of the House
Karnataka Assembly passes 4% Muslim Quota Bill amid ruckus as BJP MLAs throw papers on Speaker

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
कर्नाटकमध्ये सध्या हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. सहकार मंत्री के. एन. राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना एक मोठा दावा केला होता. ‘एका केंद्रीय नेत्यासह जवळपास 48 नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत’, असं के. एन. राजन्ना यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या दाव्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर कर्नाटकच्या विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
मुस्लिम आरक्षण विधेयक आणि हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यातच आज कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. तसेच कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला भाजपाने कायदेशीररित्या आव्हान देण्याचा निर्णय घेतला.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला भाजपाने जोरदार विरोध करत विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच भाजपाच्या काही आमदारांनी या विधेयकाची प्रत आणि काही कागदपत्रे थेट विधानसभेच्या अध्यक्षांवर भिरकावल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपा आमदारांच्या प्रचंड गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करण्यात आलं.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्यांवरून भाजपा नेत्यांनी सभागृहाच्या वेलमध्ये घुसून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच विरोधी आमदरांनी सभापतींच्या आसनापाशी जाऊन कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. भाजप आमदार भरत शेट्टी यांनी म्हटलं की, हनी ट्रॅपच्या मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 4 टक्के मुस्लिम विधेयक मांडण्यात व्यस्त आहे. मात्र,आम्ही याचा निषेध केला आहे. आम्ही कोणालाही इजा केलेली नाही, असं भरत शेट्टी यांनी म्हटलं आहे.
18 आमदारांचे पुढील 6 महिन्यासाठी निलंबन @विधानसभा
सभापती पदाचा अनादर केल्याबद्दल सभापती यूटी खादर यांनी 18 भाजप आमदारांना पुढील 6 महिन्यांसाठी विधानसभेतून निलंबित केले आहे.
कोणाला निलंबित केले आहे?
दोड्डण्णा गौडा पाटील
सी.के. राममूर्ती
अश्वथ नारायण
एस आर विश्वनाथ
भैरती बसवराज
एम आर पाटील
चन्नाबसप्पा
बी सुरेश गौडा
उमानाथ कोटियन
शरणू सलागर
शैलेंद्र बेलदाले
यशपाल सुवर्णा
हरीश बीपी
डॉ. भरत शेट्टी
मुनिरत्न
बसवराजा मत्तीमोद
धीरज मुनिराजू
डॉ. चंद्रू लमाणी
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Karnataka Assembly passes 4 Muslim Quota Bill amid ruckus as BJP MLAs throw papers on Speaker

Muslim Quota Bill amid ruckus as BJP MLAs

कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ Video; अध्यक्षांसमोर कागदपत्रे भिरकावली
सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने; 18 आमदारांचे पुढील 6 महिन्यासाठी निलंबन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm