बेळगाव—belgavkar—belgaum : इफ्तार पार्टी सुरु असताना एक तरुण शास्त्री गल्लीत दुचाकी घेऊन जात असल्याचे पाहून वादावादी आणि शाब्दीक चकमक उडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मात्र, मार्केट पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दरबार गल्लीजवळ शास्त्री गल्ली आहे. याठिकाणी दुचाकी घेऊन एक तरुण येत असल्याचे पाहून आयोजकांनी त्याला अडविले व सध्या मार्ग बंद ठेवण्यात आला असून बाजूला दुचाकी पार्क कर, असे सांगितले.
मात्र, दुचाकीस्वार तरुणाने जवळ गल्ली असून मला जाऊ द्या, असा हट्ट धरला. यावरून वादावादी झाली आणि शाब्दीक चकमक उडाली. यामुळे तातडीने घटनास्थळी मार्केट पोलिस दाखल झाले. यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आली.
