@कर्नाटक भाजपा आमदारांना उचलून बाहेर काढलं

कर्नाटक भाजपा आमदारांना उचलून बाहेर काढलं

आमदारांचा VIDEO व्हायरल
काँग्रेस आमदारांच्या हातात CD

Karnataka Assembly : House marshals remove MLAs

अधिवेशनात 48 नेत्यांच्या हनीट्रॅप प्रकरणी मोठा राडा, 18 जण निलंबित
आमदार वेलमध्ये उतरले. अध्यक्षांच्या खुर्चीकडे पेपर फेकले..
आमदारांवर निलंबनाची कारवाई
18 Karnataka BJP MLAs suspended from Assembly. removed by marshals

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
कर्नाटक : बंगळुरू : कर्नाटक विधानसभा अधिवेशनात 48 नेत्यांच्या हनीट्रॅप प्रकरणी मोठा राडा पाहायला मिळाला. शुक्रवारी या आरोपांवर विधानसभा सभागृहात गोंधळ झाला. भाजपा आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले. त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीकडे पेपर फेकले, ज्यामुळे मार्शल यांना सभागृहात यावं लागलं.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
18 Karnataka BJP MLAs suspended after protests on ‘honey-trapping’ allegations in Assembly
या अभूतपूर्व गोंधळानंतर मार्शलने भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढले. या गोंधळ घालणाऱ्या 18 आमदारांवर 6 महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारचे संसदीय कामकाज मंत्री एच. के पाटील यांनी 18 भाजपा आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. सत्ताधाऱ्यांनी तो पारित करून आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
या सदस्यांच्या निलंबनावर मंत्री एच. के पाटील म्हणाले की, या सदस्यांनी सभागृहात ज्याप्रकारचे कृत्य केले ते योग्य नव्हते. कुठल्याही विधिमंडळ परंपरेला ते शोभणारे नव्हते. त्यामुळे या सर्वांवर जी निलंबनाची कारवाई झाली ती 100 टक्के योग्य असल्याचं त्यांनी सांगितले.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
विधानसभेत हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून गोंधळ
गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्‍यांसह जवळपास 49 नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला. त्याशिवाय हा मुद्दा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही असंही त्यांनी सांगितले. शुक्रवारी याच मुद्द्यावरून भाजपा आमदारांनी विधानसभा सभागृहात गोंधळ घातला. कारण काही काँग्रेस आमदार हातात सीडी घेऊन त्यांच्याकडे हनीट्रॅपचे व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा करत होते. 
आमदारांविरोधात मोठं षडयंत्र - भाजपा
दरम्यान, या गोंधळानंतर कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सरकारवर निशाणा साधला. हा कुठल्याही एका पक्षाचा मुद्दा नाही, जनतेसाठी काम करणाऱ्या आमदारांविरोधात मोठं षडयंत्र आहे. काही लोक आपला अजेंडा रेटण्यासाठी हनीट्रॅप करतात असं म्हटलं. त्यावर हनीट्रॅप प्रकरणात कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच नाही. कायद्यानुसार या प्रकारातील दोषींना शिक्षा मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री सिद्धाराम्मया यांनी सरकारचा बचाव करताना दिले. 

The suspended legislators include Opposition Chief Whip Doddanagouda H Patil, Ashwath Narayan CN, SR Vishwanath, BA Basavaraj, MR Patil, Channabasappa (Channi), B Suresh Gowda, Umanath A Kotyan, Sharanu Salagar, Shailendra Beldale, CK Ramamurthy, Yashpal A Suvarna, BP Harish, Bharath Shetty Y, Munirathna, Basavaraj Mattimood, Dheeraj Muniraju, and Chandru Lamani.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Karnataka BJP MLAs being carried out of the Assembly after their suspension

18 Karnataka BJP MLAs suspended after protests on ‘honey trapping’ allegations in Assembly

18 Karnataka BJP MLAs suspended from Assembly removed by marshals

@कर्नाटक भाजपा आमदारांना उचलून बाहेर काढलं
आमदारांचा VIDEO व्हायरल; काँग्रेस आमदारांच्या हातात CD

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm