मुस्लिम आरक्षण आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार“constitution will be changing”remarks about changing Constitution
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code

कर्नाटक राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्यावरून आज संसदेत प्रचंड गोंधळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु होताच, कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणावरून ट्रेझरी बेंचच्या सदस्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज पहिल्यांदा दुपारी 12 वा. पर्यंत, नंतर दुपारी 2 पर्यंत आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
काँग्रेस मुस्लिम आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान का बदलत आहे? याचे उत्तर द्यावे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशाचे संविधान बाबासाहेबांनी बनवले. त्याला कोणीही बदलू शकत नाही. ते सुरक्षित राहावे यासाठी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली.
आपण संविधान बदलणार आहोत असे कोणी म्हटले? यावर किरण रिजिजू म्हणाले की, बाबासाहेबांनी नाकारलेले मुस्लिम लीगचे धोरण राबवून काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांची प्रतिष्ठा कलंकित केली आहे. किरण रिजिजू यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले विधान वाचून दाखवले आणि काँग्रेस अध्यक्षांना कारवाई करण्याचे आव्हान दिले. गदारोळानंतर अध्यक्षांनी 12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरु होताच किरेन रिजिजू यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेल्या वादग्रस्त विधानावरून संसदेत गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर एका कार्यक्रमात म्हटले होते की, जर मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी संविधानात सुधारणा करावी लागली तर ते करतील. त्यांच्या विधानावरून आज राज्यसभेत वाद निर्माण झाला, ज्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या मुद्द्यावर संसदेत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये जोरदार चर्चा झाली.D K Shivakumar denies making comments on changing Constitution for Muslim reservationकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सोमवारी राज्यातील मुस्लिमांसाठी 4 टक्के आरक्षण सामावून घेण्यासाठी संविधानात बदल करण्याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला आणि त्यांचा चुकीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा केला. मी असे म्हटलेले नाही की आम्ही संविधान बदलणार आहोत. ते जे काही ते करत आहेत ते चुकीचे आहे. ते त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्हाला संविधान काय आहे हे माहित आहे.
