Irfan Pathan sacked from IPL 2025, punished harshly by BCCI due to this player?आयपीएल 2025 मध्ये भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण समालोचन करताना दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. इरफान पठाणला का घेतलं नाही? अशी चर्चा होत असताना, वृत्तानुसार इरफानला कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर केलं गेलं, अशी माहिती समोर आली होती. इरफान पठाण समालोचन करताना व्यक्तिगत टीका करतो, अशी तक्रार काही भारतीय खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
पठाणचे काही वर्षांपूर्वी काही खेळाडूंसोबत वाद झाले होते, तेव्हापासून तो या खेळाडूंबाबत आक्रमक टिप्पणी करत आहे, असं टाईम्स ऑफ इंडियाच्या या वृत्तात लिहिण्यात आलं होतं.इरफान पठाणचे खेळाडूशी मतभेद?या प्रकरणावर इरफान पठाण किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलं नाही. परंतू इरफान पठाणचे कोणत्या खेळाडूशी मतभेद झाले? त्याला आयपीएल समालोचन सोडावं लागलं याचं कारण काय होतं? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी कान उपटले असून अनेक अंदाज देखील वर्तविले जात आहेत. सोशल मीडियावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्यात इरफान पठाण विराट कोहलीवर टीका करताना दिसतोय.
इरफानवरच कारवाई का?इरफान पठाण खेळातील राजकारणाचा बळी ठरतोय का? असा प्रश्न देखील विचारला जातोय. इरफान पठाण गौतम गंभीरचा जवळचा मानला जातो. परंतू इरफान पठाणने कठोर शब्दात टीका केल्याचं काही खेळाडूंना पटलं नाही. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देव आणि सर्व समालोचक वेळोवेळी खेळाडूंवर टीका आणि कौतुक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली का? असा सवाल देखील नेटकरी करत आहेत. दरम्यान, इरफान पठाणचा दोन महिने जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.Click Here to Watch Videos or See More Photos
इरफान पठाणने विराटवर काय टीका केली?विराट कोहली घरगुती स्पर्धेमध्ये शेवटचा कधी खेळला होता तर एका दशकापूर्वी. पहिल्या डावामध्ये 2024 ला विराटची सरासरी 15 इतकी होती. वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तर तो सुद्धा 25-30 ची सरासरी देईल, असं इरफान पठाण म्हणाला होता. तसेच इरफान पठाणने रोहित शर्मावर देखील टीका केली होती.सीधी बात विथ इरफान पठाणदरम्यान, आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर झाल्यानंतर इरफान पठाणने 22 मार्चला स्वतः चं युट्युब चॅनल लॉन्च केलं. सीधी बात विथ इरफान पठाण, या नावाने लॉन्च करण्यात आलेल्या या युट्युब चॅनलवर इरफान पठाण मॅचचं विश्लेषण करणार आहे.
