Kunal Kamra takes on Shiv Sena with new song after Mumbai studio vandalismमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गीतानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आला. यानंतर त्याने सोशल मीडियावरून 'मी जमावाला घाबरत नाही, मी माफी मागणार' नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या विडंबन गीतामधून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्याने हे गीत त्याच्या एक्स आणि इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाऊंटवरून आज (दि.25) रिलीज केले आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
I will not apologise for what I said - Kunal Kamraमन में हैं अंधविश्वास...स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केले. यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळासह राज्यभर उमटले. दरम्यान कुणाल कामरा यांने सोशल मीडिया एक्स आणि इन्स्टाग्रामवर तो त्याच्या वक्तव्यावरून ठाम असल्याचे म्हटले होते. तसेच मी माफी मागणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्याने आज पुन्हा एकदा 'हम होंगे कामयाब..., हम होंगे कामयाब..., हम होंगे कामयाब एक दिन..., मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश....' असे गीत म्हटले आहे.
'विक्षिप्त भारत'चे नवीन गीत कॉमेडियन कुणाल कामरा याने रिलीज केलेल्या विडंबन गीतामध्ये त्याच्या स्टुडिओच्या झालेल्या तोडफोडीचा निषेध केला आहे. त्याने 'विक्षिप्त भारत' चे नवीन गीत असे म्हटले आहे. यामध्ये देश आणि राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर देखील त्याने हल्लाबोल केला आहे. त्याने भाजप सत्ताकाळातील देशातील परिस्थिती सध्या कशी आहे आणि यापुढे कशी असेल यावर देखील गीतातून व्यक्त केले आहे.
