बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येतील (31 मे पूर्वी). या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातील, अशी माहिती कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संग्रीशी यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
Ballot papers will replace Electronic Voting Machines (EVMs) amid ongoing concerns about EVM hacking, announced State Election Commissioner GS Sangreshielections to the zilla panchayats and taluk panchayats in April or May
या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातील, अशी माहिती कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संग्रीशी यांनी दिली आहे. मतदान यंत्राबाबत तक्रारी वाढल्या आहेत. ही यंत्रे हॅक केली जातात, असा आरोप काही मतदारांनी केला आहे. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका पारदर्शी पद्धतीने घेण्याचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे, असे संग्रीशी म्हणाले.
जिल्हा आणि तालुका पंचायतींची आरक्षण यादी सरकारने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही. त्याविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. सरकारनेही शक्य तितक्या लवकर यादी सादर करण्याची गरज आहे. ते झाल्यास एप्रिल-मे मध्ये निवडणुका घेण्यासाठी आम्हाला पाऊल उचलता येईल, असे संग्रीशी यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
